मडूरेत शिवजयंती निमित्त खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा
मडूरा येथील छत्रपती शिवाजी महाराज वॉट्सॲप ग्रुपतर्फे बुधवार १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ८ वाजता भव्य मिरवणूक, ९ वाजता माऊली मंदिर येथील रंगमंचावर शिव पूजा व दीप पूजन होईल.
सायंकाळी ६ वाजता खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा होईल. यासाठी प्रथम पारितोषिक ३ हजार रुपये व चषक, द्वितीय २ हजार रुपये व चषक आणि तृतीय १ हजार रुपये व चषक देण्यात येईल. इच्छुक स्पर्धकांनी प्रवीण परब (७०५७८७८९३९) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.