मंगेश लोके मित्रमंडळ खांबाळे व शिवप्रेमी मित्रमंडळ खांबाळे यांच्या मार्फत खांबाळे येथे शिवजयंती साजरी करण्यात येणार असून शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

 

 

वैभववाडी (प्रतिनिधी)

मंगेश लोके मित्रमंडळ खांबाळे व शिवप्रेमी मित्रमंडळ खांबाळे यांच्या मार्फत खांबाळे येथे शिवजयंती साजरी करण्यात येणार असून शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत .

शिवप्रेमींची लोरे नंबर दोन शिवाजी महाराज पुतळा ते वैभववाडी संभाजी चौक पर्यंत रिक्षा व मोटरसायकल रॅली, महिलांसाठी हळदीकुंकू,मुली व महिलांसाठी खास संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे .

तसेच शिवजयंती निमित्त गुरुवार दि . 20/2/2025 रोजी रात्री 9:00 वाजता रणमर्द मराठ्यांचा शिवकालीन युद्ध धगधगता इतिहास सोबत यांचा मावळा शाहीर मिलिंद सावंत ऐतिहासिक पोवाडे व शिवसंस्कारातील समाजप्रबोधनावर बहारदार निवेदन कोल्हापूर भूषण वस्ताद श्री आनंदराव ठोंबरे व यांचे मर्दानी खेळ आयोजित करण्यात आला आहे . शिवप्रेमी महिलांसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आली असून पहिल्या एक ते तीन क्रमांकासाठी लालबागचा राजा चे फोटो फ्रेम देण्यात येणार आहे . हा कार्यक्रम खबाळे केंद्रशाळा पट्टांगण या ठिकाणी होणार असून या कार्यक्रमासाठी तालुक्यातील शिवप्रेमीनी उपस्थित राहावे . असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *