आडवली येथे १९ रोजी जिल्हास्तरीय खुली एकपात्री अभिनय स्पर्धा

0 minutes, 0 seconds Read

 

आचरा :अर्जुन बापर्डेकर

आडवली येथे १९ रोजी जिल्हास्तरीय खुली एकपात्री अभिनय स्पर्धा

आडवली येथील सनराईज शिवजन्मोत्सव मंडळाच्यावतीने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने रात्री ९ वाजता जिल्हास्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा होणार आहे.

ही स्पर्धा खुल्या वयोगटासाठी असून स्पर्धेचा विषय हा शिवकालीन किंवा संतकालीन व्यक्तिरेखा-प्रसंग सादरीकरण हा आहे. विजेत्या पहिल्या पाच स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदनी आवश्यक आहे. नोंदणीसाठी मिलिंद चव्हाण- 9403229230/ 9322191369 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *