हळवल फाट्यावरील अपघात रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करा – अबिद नाईक 

0 minutes, 2 seconds Read

कणकवली (प्रतिनिधी)

हळवल फाट्यावरील अपघात रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करा – अबिद नाईक 

महामार्ग प्राधिकरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा दिला इशारा 

मुंबई गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथे सातत्याने अपघात होत आहेत. गेल्या तीन वर्षात येथे आठ ते दहा जणांचे बळी गेले आहेत. हे अपघात रोखण्यासाठी गतिरोधक किंवा इतर उपाययोजना एक महिन्याच्या आत कराव्यात, अन्यथा महामार्ग प्राधिकरण कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी शुक्रवारी दिला.

 

 

श्री. नाईक यांच्यासह, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर, तालुकाध्यक्ष राजू पावसकर, प्रांतिक सदस्य विलास गावकर, युवक तालुकाध्यक्ष निशिकांत कडुलकर आदींनी शुक्रवारी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, हळवल फाटा येथे मोठे कंटेनर पलटी होतांना अनेक माणसे केवळ सुदैवाने बचावलेली आहेत. २ फेब्रुवारीच्या पहाटे याच वळणावर एक काचा भरलेला कंटेनर पलटी होवून त्यातील दोन्ही व्यक्ती केवळ सुदैवाने वाचल्या आहेत. तसेच अपघात रात्रीच्या वेळी झाल्याने माणसांची वर्दळ नव्हती म्हणून मनुष्यहानी टळली आहे.

 

 

गेली ४ वर्षे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसपक्षा मार्फत अनेक वेळा ह्या ठिकाणी डांबराचे छोटे गतिरोधक घालणे, मोठ्या अक्षरात वळणदर्शक फलक लावणे, हायमॅक्स बसविणे ह्या मागण्या केलेल्या आहेत. मात्र महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी कोणतीही कार्यवाही करत नाहीत.

 

आंदोलन केल्यानंतर कार्यवाही करण्याचे आश्वासन देतात. त्यानंतर प्रत्यक्षात काहीही उपाय योजना करत नाहीत. महामार्गावरील राजापूर पुलालगत जसे छोटे गतिरोधक घातलेले आहेत. तसेच गतीरोधक गडनदी पुलाच्या पूर्वी आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला घालणे आवश्यक आहे. जेणेकरुन वाहनांची गती अपघात होणार नाहीत. तसेच वळणावर हायमॅक्स बसवावा जेणेकरुन रात्रीच्या वेळी वाहन चालकांच्या वळण सहज नजरेत येईल. त्यामुळे वाहन चालकांना सावधगिरी बाळगता येईल. यापुढे अपघात होवून कोणीही मृत्यूमुखी पडल्यास महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना ३०२ कलमाअंतर्गत कारवाई व्हावी ही आमची आग्रही मागणी आहे.

सदर बाबतीत एक महिन्याच्या आत कार्यवाही न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने महामार्ग नोटीस देवून बंद करणेत येईल. तसेच प्राधिकरणा-च्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल याची नोंद घ्यावी. त्याप्रमाणे संबंधितांना सूचना देवून उचित उपाययोजना करणेत यावी. व लोकांच्या जीवीतास धोका असलेली टांगती तलवार थांबवावी अशी विनंती आहे. यावेळी केदार खोत, शहराध्यक्ष इमरान शेख, सचिव मुस्ताक काझी, कृष्णा गावकर प्रथमेश गोसावी, प्रेमानंद नाईक सूर्यकांत नाईक, अशोक पेडणेकर विजय तेजम, प्रकाश पालव किशोर तेली, संतोष गावकर, चंद्रकांत मेस्त्री, श्रद्धा गावकर स्नेहा गावकर, संजना गावकर क्षमा कामत, दर्शना घाडीगावकर आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *