कणकवली (प्रतिनिधी)
इको फ्रेंडली गोठा रिल्स स्पर्धेत कळसुली येथील रुजाय इशेद फर्नांडिस राज्यात प्रथम
वेस्टर्न रीजन युथ कॉन्फरन्स दरम्यान नाशिक येथे पुरस्कार जाहीर
25 डिसेंबर 2024 रोजी ख्रिसमस नाताळ सणाचे औचित्य साधून वेस्टर्न युथ कोन्सिलने इको फ्रेंडली गोठा रिल्स स्पर्धा महाराष्ट्र, गोवा, गुजरात या ३ राज्यातील घेण्यात आली. या स्पर्धेत सिंधुदुर्गातील ४ युवक विजेते मानकरी ठरले.
कणकवली तालुक्यातील कळसुली गावचे कु.रुजाय इशेद फर्नांडिस प्रथम क्रमांक पैरिश फणसवाडी फातीमा चॅपल (कळसुली), अरुलशॉन डिसोझा द्वितीय क्रमांक (सांवतवाडी) , अँथोनी दुमींग डीसोझो तृतीय क्रमांक (सांवतवाडी) अविशाई मार्टीस – सेंट जोसेफ चर्च, (कट्टा – बाजारपेठ मालवण) विजेत्या स्पर्धकांचे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सर्व ख्रिस्ती बांधवांसह सिंधूदुर्ग बिशपच्या अधिकारातील प्रदेशाच्या वतीने सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले जात आहे.
