माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत उत्कर्षा अंतर्गत माता-पालक व किशोरवयीन मुलींना मागदर्शन

0 minutes, 2 seconds Read

 

कणकवली ( प्रतिनिधी)

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत उत्कर्षा अंतर्गत माता-पालक व किशोरवयीन मुलींना मागदर्शन

कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी येथे वार- मंगळवार, दिनांक- १ फेब्रुवारी २०२५ रोजी, प्रशालेत उत्कर्षा अंतर्गत माता- पालक व किशोरवयीन मुलींना शरीराचे आरोग्य व संवर्धन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

उत्तम व चांगले आरोग्य ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. याच अनुषंगाने प्रशालेत वर्षभर मुलांना विविध प्रकारे आरोग्य विषयक मार्गदर्शन व शिबीरे आयोजित केली जातात. उत्कर्षा अंतर्गत विशेष आरोग्य वर्गाचे मार्गदर्शन आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक डॉ. मनुजा भोसले, मेडिकल ऑफिसर प्राथमिक आरोग्य केंद्र, कनेडी यांनी मुलींना दैनंदिन आहार व मासिक पाळी तसेच इंटरनेट व मोबाईल मुळे होणारे आरोग्याचे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. सौ.शिरसाट मॅडम, परिचारिका प्राथमिक आरोग्य केंद्र, सांगवे यांनी विद्यार्थिनींना क्षयरोग संदर्भात आरोग्याची घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. पालवे सर यांनी सदर प्रशालेतील मुलींच्या समस्या व माता- पालकांच्या समस्या लक्षात घेऊन शरीराचे आरोग्य व संवर्धन या विषयी उत्कृष्ट मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री.सुमंत दळवी, प्रमुख उपस्थिती प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. बयाजी बुराण, प्रशालेतील सर्व महिला शिक्षिका, शिक्षकेतर महिला कर्मचारी, माता- पालक व महिला आरोग्य कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थीनी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन व आभार सहाय्यक शिक्षिका सौ.मृणाल साटम यांनी केले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *