रिक्षा संघटना तळेरेचा ३१ सावा वर्धापन दिन ४ फेब्रुवारी रोजी :- विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

 

कणकवली (प्रतिनिधी)

रिक्षा संघटना तळेरेचा ३१ सावा वर्धापन दिन ४ फेब्रुवारी रोजी :- विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

तळेरे येथील रिक्षा संघटनेच्या ३१ साव्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार दि. ४ फेब्रुवारी २०२५ रोजी तळेरे एसटी बस स्थानकासमोर विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.मंगळवारी सकाळी ९ वाजता,श्री सत्यनारायण महापूजा, १० वाजता श्री पावणादेवी ढोलपथक, गोवळ यांचे ढोल वादन, १०.३० वाजता आरती व तिर्थप्रसाद, ११.०० वाजता श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे स्थानिक भजन, दुपारी १ ते ३ वाजता महाप्रसाद, दुपारी २.३० वाजता ,
पंचक्रोशीतील माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण सोहळा, दुपारी ३ ते ५ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, ३.३० वाजता श्री देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ- कुडाळ भैरववाडी यांचा फुगड्यांचा कार्यक्रम, सायंकाळी ६ वाजता ऋतू वेध प्रस्तुत “स्वरगंध” हा हर्ष नकाशे आणि इतर गायकांच्या सुरेल गीतांच्या मैफिलीचा नजराणा सादर करण्यात येणार आहे.

तर रात्री ९ वाजता चिमणी पाखरं डान्स ॲकॅडमी- कुडाळ आयोजित चाळीस कलाकारांच्या विविधांगी जलवा २०२५ मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच श्रीरामाचा अयोध्या देखावा खास आकर्षण आहे.
तरी या सर्व कार्यक्रमांचा सर्वांनी आवश्य उपस्थित रहावे असे आवाहन रिक्षा संघटनेचे अध्यक्ष राजकुमार तळेकर व खजिनदार संजय पेंढारकर यांनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *