सावंतवाडी (प्रतिनीधी)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकुळ नं. 4 मराठी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ व उत्साहात
सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकुळ नं. 4 मराठी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ व उत्साहात संपन्न झाले. या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन चौकूळ मराठी वाडीतील निवृत्त सैनिक गजानन गावडे आणि नामदेव गावडे यांच्या हस्ते झाले.
विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देणारे व्यासपीठ म्हणजेच वार्षिक स्नेहसंमेलन होय. या व्यासपीठावरून आपल्या मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने पालकांची उपस्थित होती. त्यामध्ये विशेषत: महिलांची उपस्थिती दर्शनीय होती.
