बांदा (मंगल कामत)
स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कचऱ्याचे ढीग असल्यामुळे बांदा येथील ग्रामस्थ आक्रमक
उपसरपंच सह सर्वांनाच धारेत धरल्यावर दोन दिवसात कचरा हटवून रस्ता मोकळा करू असे आबा धारगळकर यांचे आश्वासन

स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच शहरातील कचरा टाकण्यात आल्याने शहरातील सर्वपक्षियांनी उपसरपंच आबा धारगळकर यांच्यासह ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरले. जोपर्यंत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत नाही तोपर्यंत कचरा याठिकाणी टाकू नये, अन्यथा तो ग्रामपंचायत कार्यालयासमोर कचरा जमा करावा, अशा सूचना ग्रामस्थांनी दिल्या.
