श्री देव क्षेत्रपाल ग्रामसंघ व आंबेगाव ग्रामपंचायतच्या वतीने ‘म्हारकटेवाडी बालसभे’ची स्थापना

0 minutes, 3 seconds Read

 

सावंतवाडी (प्रतिनीधी) 

श्री देव क्षेत्रपाल ग्रामसंघ व आंबेगाव ग्रामपंचायतच्या वतीने ‘म्हारकटेवाडी बालसभे’ची स्थापना

आंबेगाव येथे PRI CBO अभिसरण प्रकल्पाअंतर्गत उमेद अभियानचा श्री देव क्षेत्रपाल ग्रामसंघ व आंबेगाव ग्रामपंचायतच्या वतीने ‘म्हारकटेवाडी बालसभे’ची स्थापना करण्यात आली. ‌

आंबेगाव येथे उमेद अभियानांतर्गत कार्यरत असणारा श्रीदेव क्षेत्रपाल ग्रामसंघ व आंबेगाव ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने अभिसरण प्रकल्पाअंतर्गत म्हारकटेवाडी येथे वय वर्ष ६ ते १८ वयोगटातील मुलांची बालसभा स्थापन करण्यात आली.मुलांना असणाऱ्या समस्या, आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा, मार्गदर्शन याविषयीच्या मागण्या ग्रामपंचायत स्तरावर मांडण्यासाठी मुलांना हक्काचे व्यासपीठ बालसभेच्या निमित्ताने मिळणार आहे. तसेच मुलांना ग्रामपंचायत, स्वयंसहायता समूह यांची रचना प्रात्यक्षिकासह समजून घेता येणार आहे.

‘म्हारकटेवाडी बालसभे’ची अध्यक्ष म्हणून कु.श्रेया संदीप राऊळ, उपाध्यक्ष कु. प्रणय परेश तेली, सचिव कु. विद्या देऊ जंगले, सहसचिव कु. नाना पुनाजी बरागडे, कोषाध्यक्ष कु. प्रतीक्षा प्रशांत पंदारे यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाला आंबेगाव ग्रामपंचायत चे सरपंच संजू परब, उपक्रमासाठी केरळ येथील ‘कुडुंब श्री’ च्या गिरिजा संतोष यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर श्रावणी वेटे, प्राची राऊळ, ग्रामसंघाच्या पदाधिकारी रेखा गावडे प्रभाग समन्वयक अभय भिडे आदी उपस्थित होते. तसेच उमेद च्या महिला उपस्थित होत्या. हा उपक्रम सुरू करण्यासाठी आंबेगाव च्या LRP व CRP म्हणून कार्यरत असणाऱ्या साक्षी संदीप राऊळ यांनी विशेष प्रयत्न केले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *