शालिनी पवार स्मृती निबंध स्पर्धेत सिध्दी आईर,वेदिका मेस्त्री प्रथम

0 minutes, 0 seconds Read

 

आचरा-अर्जुन बापर्डेकर

शालिनी पवार स्मृती निबंध स्पर्धेत सिध्दी आईर,वेदिका मेस्त्री प्रथम

दत्ता व भाऊ पवार परिवार आणि गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय त्रिंबक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

दिवंगत शालिनी शिवराम पवार यांच्या २१ व्या स्मृतीदिना निमित आयोजित वात्सल्य सिंधू आई” या विषयावरील निबंध स्पर्धेत दत्ता पवार, भाऊ पवार आणि कुटुंबीय तसेच कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय यांच्या संयुक्त वि‌द्यमाने ‘वात्सल्य सिंधू आई” या विषयावर जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेच्या वि‌द्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये निबंध स्पर्धा आयोजित केली होती.  

लहान गटा मध्ये प्रथम क्र. सिध्दी संतोष आईर तर मोठा गटा मध्ये प्रथम क्र. वेदिका उदय मेस्त्री यांनी प्रथम क्रमांक मिळविला.दत्ता पवार, भाऊ पवार आणि कुटुंबीय तसेच कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय यांच्या संयुक्त वि‌द्यमाने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

दिवंगत शालिनी पवार यांच्या २१ व्या स्मृतीदिना निमित विजेत्या स्पर्धकांचा बक्षीस वितरण समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्रामध्ये आयोजित केला होता. स्पर्धा २ गटांमध्ये आयोजित केली होती. विजेते स्पर्धक लहान गटा मध्ये प्रथम क्र. सिध्दी संतोष आईर, ‌द्वितीय क्र. मनुजा संतोष सावंत, तृतीय क्र. मंजिरी गणेश जाधव, उत्तेजनार्थ विदिशा नागेश साटम व वंशिका चेंदवणकर, तर मोठा गटा मध्ये प्रथम क्र. वेदिका उदय मेस्त्री, द्वितीय क्र. वैष्णवी संदीप आईर, तृतीय क्र. प्रियांका किशोर त्रिंबककर उत्तेजनार्थ स्वरीत एकनाथ गायकवाड व साक्षी वासुदेव परब या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, रोख रक्कम, सन्मान चिन्ह आणि प्रसिद्ध लेखक उत्तम कांबळी लिखित “आई समजून घेताना” हे प्रसिद्ध पुस्तक देण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेंद्र(अन्ना) सकपाळ होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकनाथ गायकवाड यांनी केले. या प्रसंगी प्रमुख वक्ते जनता विद्या मंदिर मुख्याध्यापक प्रवीण घाडीगावकर, आचरा कनिष्ठ महावि‌द्यालयाच्या प्राध्यापिका सौ. अनघा कदम, विशेष अतिथी सरपंच किशोर त्रिंबककर, माजी उपसभापती पं. स. मालवण अशोक बागवे, सिंपन प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष श्री. अनिल तांबे यांनी “आई आणि सामाजिक कार्य” या विषयावर मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत गोसावी सर यांनी केले.

यावेळी ग्रा. पं. सदस्य, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,ग्रामस्थ आदी उपस्थित होते. कार्यक्रमच्या आयोजनासाठी कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय आणि त्रिंबक बौद्ध‌विकास मंडळ मुंबई आणि ग्रामीण शाखेच्या सदस्यांनी बहुमोल सहकार्य केले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *