युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ,सांगवे आयोजित बेसिक रोबोटिक्स निर्मिती कार्यशाळा

0 minutes, 0 seconds Read

 

कणकवली ( प्रतिनिधी)

युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ,सांगवे आयोजित बेसिक रोबोटिक्स निर्मिती कार्यशाळा

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत वार- रविवार, दिनांक २६ जानेवारी २०२५ व २७ जानेवारी २०२५ रोजी बेसिक रोबोटिक्स निर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

युवा संदेश प्रतिष्ठान चा २७ वा वर्धापन दिन असल्याने या विशेष कार्यशाळेचे आयोजन युवा संदेश प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा, सन्मा.श्री. संदेशजी सावंत संचालक, कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई. सन्मा. संजना सावंत माजी जि.प. अध्यक्षा यांच्या वतीने ही कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक सन्मा. श्री. दत्तात्रय उर्फ सागर सावंत, कनेडी गट शिक्षक प्रसारक मंडळाचे संचालक, सन्मा.श्री. निर्मल ठाकूर प्रशिक्षक, सन्मा. श्री.अमेय राऊत प्रशिक्षक तसेच युवा संदेश प्रतिष्ठानचे कार्यकर्ते श्री. संजय सावंत, श्री.भालचंद्र सावंत, सर्व पंचक्रोशील सामाजिक कार्यकर्ते, कनेडी प्रशालेचे शालेय समिती चेअरमन श्री.आर.एच. सावंत, मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक श्री.बयाजी बुराण, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि जि.प. शाळेचे शिक्षक व प्रशिक्षणार्थी २०० विद्यार्थी उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सहा. शिक्षक श्री. प्रसाद मसुरकर यांनी केले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *