रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड च्या वतीने गरजू विद्यार्थ्यानीना दप्तर वाटप

0 minutes, 0 seconds Read

देवगड (स्वप्नील लोके) २४ जुलै २०२४

 

रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड च्या वतीने गरजू विद्यार्थ्यानीना दप्तर वाटप

 

देवगड रोटरी क्लब च्या वतीने आज देवगड तालुक्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थिनीना दप्तर वाटप करण्यात आले. ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळा दाभोळे नंबर 1 मधील 17 विद्यार्थिनीना ,जि.प . शाळा लिंगडाळ मधील 6 व जि.प . शाळा मीठमुंबरी मधील 13 विद्यार्थीनीना दप्तर देण्यात आली.सदर दप्तर रो.उत्कर्षां पाटील रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर ह्यांच्या सहकार्याने प्राप्त झाली होती. या वेळी देवगड रोटरी क्लब चे सेक्रेटरी रो.गौरव पारकर, खजिनदार रो. अनुश्री पारकर, रो.नरेश डामरी,रो.मनीषा डामरी, रो.अनिल गांधी तसेच सर्व शाळा मधील मुख्याध्यापक शिक्षक तसेच पालक वर्ग उपस्थित होता. शाळेतील सर्व शिक्षकांनी ह्या स्तुत्य उपक्रमा बाबत रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड चे आभार मानले.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *