किंजवडे येथे पाणी गुणवत्ता कार्यशाळा संपन्न

0 minutes, 0 seconds Read

 

देवगड (स्वप्नील लोके)२४ जुलै २०२४

 

किंजवडे येथे पाणी गुणवत्ता कार्यशाळा संपन्न

 

पंचायत समिती देवगड व ग्रामपंचायत किंजवडे यांच्या संयुक्त विदयमाने पाणी गुणवत्ता कार्यशाळा किंजवडे ग्रामपंचायत सभागृहात किंजवडे सरपंच संतोष किंजवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली .

यावेळी पाणी गुणवत्ता तज्ञ हर्षदा बोथीकर यांनी जैविक फिल्ड टेस्ट किट्स , तसेच रासायनिक फिल्ड टेस्ट किट्सद्वारे तपासणीबाबत प्रात्यक्षिकांस माहिती दिली तर गटसमन्वयक वैशाली मेस्त्री यांनी पिण्याच्या पाण्याचे स्वच्छता सर्वेक्षण लाल कार्ड , पिवळे कार्ड , हिरवे कार्ड याबाबत मार्गदर्शन तसेच आरोग्य विस्तार अधिकारी प्रतिमा वळंजु यांनी अतिसार रोखणे तसेच पाण्यापासुन होणारे आजार व उपाय याबाबत मार्गदर्शन केले . तर ग्रामसेवक शिवराज राठोड यांनी शाश्वत स्वच्छता बाबत मार्गदर्शन केले .

यावेळी गावातील ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे व पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता कायम रहावी यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन सरपंच संतोष किंजवडेकर यांनी केले.
यावेळी आरोग्य विस्तार अधिकारी प्रतिमा वळंजु , ग्रामसेवक शिवराज राठोड , ग्रामपंचायत सदस्य किरण टेबुलकर , गणेश जोईल , रश्मी परब, आरती मिठबांवकर , प्रविण तेली , वृषाली तळवडेकर , गटसमन्वयक वैशाली मेस्त्री , पाणी गुणवत्ता तज्ञ हर्षदा बोथीकर आदी मान्यवर उपस्थित होते . तसेच अंगणवाडी सेविका , शिक्षकवृंद , आरोग्य सेविका , आशा ,हॉटेल व्यवसायिक ,दुकानदार , ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते .या प्रशिक्षणाचे प्रस्ताविक सरपंच संतोष किंजवडेकर तर आभार ग्रामसेवक शिवराज राठोड यांनी मानले .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *