माहितीच्या अधिकारात मागितलेली कागदपत्रे देण्यास सहा महिने विलंब ; उपोषणास बसताच प्रशासन ॲक्शन मोडवर ;दोन दिवसात सगळी माहिती मिळेल दिले लेखी पत्र
सारंग यांना उद्या मिळणार सगळी माहिती उपलब्ध : गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांच्या लेखी पत्रानंतर तात्या सारंग यांचे उपोषण मागे
देवगड (प्रतिनिधी) २४ जुलै २०२४
तालुक्यातील तिर्लोट ग्रामपंचायत कार्यालयात माहितीच्या अधिकाराखाली पाच वर्षाची माहिती मिळावी यासाठी लेखी अर्ज अर्जदार गोपाळ सारंग यांनी दिला होता. मात्र सहा महिने उलटून गेले तरी सुस्त प्रशासने माहितीच्या अधिकारात मागितलेली कागदपत्रे दिलेली नाहीत. ग्रामसेवक यांनी मागितलेली माहिती सादर केलेली नसल्याने बुधवार दिनांक २४ जुलै रोजी अर्जदार गोपाळ उर्फ तात्या सारंग हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत देवगड पंचायत समिती येथे उपोषण बसले होते. पंचायत समिती गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांनी त्यांच्या उपोषणाची दखल घेत आपण मागणी केलेली सर्व कागदपत्रे उद्यापर्यंत पोहोचतील असे लेखी पत्र दिल्यानंतर तूर्तास्त गोपाळ सारंग यांनी केलेले आमरण उपोषण तूर्तास मागे घेतले आहे.
देवगड तालुक्यातील तिर्लोट येथील गणेश पांडुरंग सारंग राहणार तिर्लोट आंबेरी यांनी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कारभाराबाबत ची माहिती मिळावी यासाठी त्यांनी रीतसर अर्ज केला होता मात्र त्यांनी दिलेल्या अर्ज ला केराची टोपली दाखवत ग्रामसेवक यांनी ही माहिती देण्यास टाळाटाळ केली. अखेर याबाबत सारंग यांनी आमरण उपोषणाचे हत्यार वापरले. सारंग यांच्या या उपोषणाची दखल गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांनी घेत संबंधित ग्रामसेवक यांना तात्काळ बोलावून घेत कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करून देण्यासंदर्भात सूचना केल्या. तसे लेखी पत्र सारंग यांनी दिल्यानंतर सारंग यानी उपोषण तूर्तास्त मागे घेतले आहे.
