विद्यार्थ्यांनी आपले नाव आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत न्यावे – आमदार अनंत (बाळा) नर

0 minutes, 3 seconds Read

 

कणकवली (प्रतिनिधी)

विद्यार्थ्यांनी आपले नाव आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत न्यावे – आमदार अनंत (बाळा) नर

वारगाव हायस्कूल मध्ये शेठ महादेव वि. केसरकर यांची 15 वी पुण्यतिथी साजरी

विद्यार्थ्यांनी शेठजींच्या अंगी असलेल्या गुणांपेकी एक तरी गुण आत्मसात करून आपले नांव राष्ट्रातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत करावे हीच शेठजींना खरी श्र‌द्धांजली ठरेल, असे प्रतिपादन वारगावचे सुपुत्र आमदार अनंत नर यांनी काढले. शेठ महादेव वि. केसरकर यांच्या 15 व्या पुण्यतिथी कार्यक्रमात बोलत होते.

 

 

वारगांव विकास मंडळ मुंबई संचलित, शेठ महादेव वि. केसरकर माध्यमिक विद्यालय वारगांव या प्रशालेत संस्थापक, शिक्षण महर्षी, समाजसुधारक शेठ महादेव वि. केसरकर यांच्या 15 व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवारी झाला.

 

यावेळी व्यासपीठावर जोगेश्वरीचे आमदार अनंत (बाळा) नर, संस्थेचे अध्यक्ष विजय केसरकर, सदानंद कानकेकर, रमेश शेट्ये, शाळा समिती सदस्य प्रकाश नर, एकनाथ कोकाटे, योगेश केसरकर, पोलीस पाटील समीर कुडतरकर, माजी विद्यार्थी राजू पांचाळ, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना संस्था अध्यक्ष विजय केसरकर म्हणाले की, शाळेच्या विकासात सर्व ग्रामस्थ, संस्था पदाधिकारी यांचा वाटा मोलाचा ठरेल.

 

 

यावेळी श्री. बी. आडोलीकर, श्रीम. संदीकर, साळिस्ते सरपंच प्रभाकर ताम्हणकर, एकनाथ कोकाटे, राजेश जाधव, सदानंद कानकेकर, मुख्याध्यापक हनुमंत वाळके आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच, यावेळी विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी ग्रामस्थ ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ. कुबडे यांनी केले.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *