प्रवासी बस मधून होणाऱ्या अवैध लगेच वाहतूक बंद न केल्यास 26 जानेवारी रोजी आमरण उपोषणास बसण्याचा निवेदनाद्वरे दिला इशारा
प्रवासी बस मधून होणाऱ्या अवैध लगेच वाहतूक बंद करण्यासाठी आज वाहन चालक सामाजिक संघ यांच्या वतीने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना लगेच वाहतूक बंद न केल्यास 26 जानेवारी रोजी आमरण उपोषणास बसण्यासाठी निवेदन देण्यात आले.
मुंबई. पुणे येथून गोवा ला जाणाऱ्या खाजगी बसेस मधून जि. एस. टी. चुकवण्यासाठी प्रवाशांना वेठीस धरून आर. टी.ओ चा कृपा आशीर्वादने बेसुमार लगेच वाहतूक सुरु आहे. या वाहतूकी मुळे मात्र टेम्पो व्यवसाय धोक्यात येऊन टेम्पो मालक चालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या अगोदर सिंधुदुर्ग चालक असोसिएन यांनी पण जिल्हाधिकारी यांना 26 जानेवारी ला उपोषणास बसण्यासाठी निवेदन दिले आहे. एवढे होऊनही कायम वादग्रस्त राहिलेले आर. टी. ओ चेक पोस्ट इन्सुलि यांच्या समोरून लगेच वाहतूक जोरदार सुरु आहे. फक्त 200 रुपयाची भिक घेऊन गाड्या सोडण्याचे काम हे अधिकारी करत आहे. या बस चे तर काही चालक आर. टी. ओ. आमच्या खिशात आहे असं बोलत आहेत. ज्या हॉटेल ला बसेस जेवणासाठी थांबतात त्या हॉटेल वाल्यांकडून आर. टी. ओ. मॅनेज करण्याचे काम सुरू आहे. आर. टी. ओ चे अधिकारी नक्की जनतेचे सेवा करताहेत कि हॉटेल वाल्यांकडे नोकरीं हा प्रश्न मात्र सर्वसामान्य जनतेला पडला आहे.