अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातुन बालकांचा सर्वांगीन विकासासाठी हे प्रशिक्षण महत्वाचे प्रकल्प अधिकारी देवगड बी.ए.होडावडेकर यांचे प्रतिपादन

 

 

देवगड (प्रतिनीधी)

अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातुन बालकांचा सर्वांगीन विकासासाठी हे प्रशिक्षण महत्वाचे प्रकल्प अधिकारी देवगड बी.ए.होडावडेकर यांचे प्रतिपादन

देवगड येथे पोषण भी पढाई भी उपक्रमातुन अंगणवाडी सेविकांच्या प्रशिक्षणास प्रारंभ झाला.अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातुन बालकांचा सर्वांगीन विकास व बौद्धीक क्षमता वाढवणे , बाल शिक्षणात आवश्यक टिचींग लर्निग मटेरीयल तयार करून त्यांचा उत्कृष्टपणे वापर करणे , सक्षम अंगणवाडी केंद्र उभारणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन बाल विकास प्रकल्प अधिकारी देवगड बी.ए. होडावडेकर यांनी प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी केल .
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय देवगड व जिल्हा परीषद सिंधुदूर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी समर्थ मंगल कार्यालय जामसंडे येथे पोषण भी पढाई भी उपक्रमातुन अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देवगड बाल विकास प्रकल्प अधिकारी बी.ए.होडावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले .

हे प्रशिक्षण ३ दिवस असुन १७ डिसेंबर ते १९ डिसेंबर 2024 या कालावधीत संपन्न होत आहे . पहिल्या दिवशीय प्रशिक्षणात पोषण भी पढाई भी प्रशिक्षणाचा परीचय त्याची उद्दिष्टे,ECCE दिवसाच महत्त्व , पालकांचा सहभाग , o ते८ वयोगटातील बालकातील सर्वांगीन विकास बाबत मार्गदर्शन करण्यात आल . या प्रशिक्षणामध्ये फणसगांव बीट,मिठबांव बीट व शिरगांव बीट मधील १oo सेविका उपस्थित होते . दुसऱ्या दिवशीच्या प्रशिक्षणात बालकांचा शारीरिक विकास ,पोषण आवश्यक गोष्टी, मुल्यमापन बाबत प्रशिक्षण तर तिसऱ्या दिवशी बालकांचा पोषन पढाई सोबत दिव्यांग बालकांच वर्गीकरण तसेच येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्याबाबत प्रशिक्षण अंगणवाडी सेविकांना देण्यात येणार आहे .

या प्रशिक्षणामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी देवगड बी.ए. होडावडेकर, मास्टर ट्रेनर सुवर्णा भगत व मनस्वी कांबळे तसेच प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका पुजा सावंत , राखी राणे , प्रियांका कुमारी लाड , प्रसन्न घाडीगांवकर आदी मान्यवर उपस्थित होते .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *