मालवण तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटना अध्यक्षपदी कैलास घाडीगांवकर, महेश गावडे कार्यवाहपदी बिनविरोध

 

मालवण (प्रतिनिधि)

मालवण तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटना अध्यक्षपदी कैलास घाडीगांवकर, महेश गावडे कार्यवाहपदी बिनविरोध

मालवण तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची सभा शनिवार ७ डिसेंबर २०२४ रोजी दु. १ वाजता ज्ञानदीप विद्यालय, हिवाळे येथे संपन्न झाली. या सभेवेळी व्यासपिठावर अनिल नाजुकराव राणे (जिल्हाध्यक्ष, शिक्षकेतर कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग) गजानन नानचे (जिल्हा कार्यवाह, शिक्षकेतर कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग / विभागीय कार्यवाह, कोल्हापूर विभाग) प्रदीप सावंत (कार्याध्यक्ष) श्रीमती. धनश्री. गावडे (लिपीक, विद्यालय, हिवाळे तथा उपाध्यक्षा, शिक्षकेतर संघटना, सिंधुदुर्ग) निलेश पारकर (जिल्हा संघटक) श्रीमती. शर्मिला गावकर (तालुकाध्यक्ष, मालवण) श्री. रुपेश खोबरेकर (तालुका कार्यवाह) यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थितांचे स्वागत श्रीमती. शर्मिला गावकर यांनी केले.

 

या सभेत सन २०२४-२५ ते २०२७-२८ या कालावधीसाठी मालवण तालुका नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तालुकाध्यक्ष – श्री. कैलास घाडीगांवकर (माध्य. विद्यालय, शिरवंडे) तालुका कार्यवाह श्री. महेश गावडे (वडाचा पाट) उपाध्यक्ष – श्री. घनश्याम राणे, उपाध्यक्ष सेवक श्री. कैलास कडू, सहसचिव श्री. अशोक वायंगणकर, खजिनदार – श्री. शशिकांत परब, प्रसिद्धी प्रमुख श्री. गजानन मांजरेकर, हिशोब तपासणीस श्री. उदय चोडणेकर, संघटक – दिनेश कदम, संघटक श्री. दयानंद पेडणेकर, जिल्हा प्रतिनिधी श्री. रुपेश खोबरेकर व श्रीमती. शर्मिला गावकर, सदस्य – श्रीमती. रेश्मा ढवण, श्री. नंदकिशोर तावडे, श्री. रविराज जाधव, श्री. संजय गोसावी, श्री. अनिरुद्ध आचरेकर, श्रीमती. सुनेशा परब यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या सर्व निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक अधिकारी म्हणून श्री. निलेश पारकर (लिपीक, डी. एड्. कॉलेज, कणकवली तथा जिल्हा संघटक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, सिंधुदुर्ग यांनी काम पाहिले. या सभेवेळी ज्ञानदीप विद्यालय, हिवाळे या संस्थेचे अध्यक्ष श्री. महेश गावडे साहेब व सचिव – श्री. चंद्रकांत चव्हाण साहेब यांनी उपस्थित राहून, उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. श्री. अनिल राणे (जिल्हाध्यक्ष) यांना उपस्थितांना संघटनेविषयी मार्गदर्शन केले. श्री. गजानन नानचे (जिल्हा कार्यवाह) यांनी मालवण तालुक्यातील शिक्षकेतर बांधवांना जानेवारी २०२५ मध्ये चंद्रपूर येथे होणा-या राज्य अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहणेबाबत आवाहन केले.

 

श्री. अनिल राणे व इतर जिल्हा पदाधिकारी वर्गाने नूतन कार्यकारिणीस गुलाबपुष्प देऊन, त्यांचे स्वागत केले. व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सभेसाठी मालवण तालुक्यातून मोठ्या संख्येने शिक्षकेतर बांधव उपस्थित होते. श्रीमती. धनश्री. गावडे (लिपीक, मा. विद्यालय, हिवाळे तथा उपाध्यक्षा, शिक्षकेतर संघटना, सिंधुदुर्ग) यांनी सर्वाना आपल्या कर्मचारीवर्गाच्या सहकार्याने चहापान व उत्कृष्ठ स्नेहभोजनाची उत्तम व्यवस्था केली होती. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार श्री. रुपेश खोबरेकर (तालुका कार्यवाह) यांनी मानले.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *