तळेरे येथील एक हात मदतीचा ग्रुप कडून शेळके कुटुंबाला 11 हजाराची मदत

 

कणकवली दि १० डिसेंबर ( प्रतिनिधी)

तळेरे येथील एक हात मदतीचा ग्रुप कडून शेळके कुटुंबाला 11 हजाराची मदत

तळेरे येथील एक हात मदतीचा ग्रुपकडून आचरा येथील काव्या शेळके कुटुंबाला तातडीने 11 हजाराची मदत करण्यात आली. काव्यावर सध्या गोवा बांबुळी येथे उपचार सुरू असून तिला आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याचे सोशल मीडियावर माहिती मिळाल्यावर ही मदत करण्यात आली.

तळेरे येथील काही तरुणांनी एकत्र येत सामाजिक अथवा गरजू व्यक्तीला मदत करता यावी यासाठी एक हात मदतीचा या नावाखाली एकत्र येत अशी मदत केली जात आहे. आचरा येथील काव्या शेळके हिच्या आजारपणाबद्दल विविध सोशल मीडियावरून समजताच तातडीने 11 हजार एवढी रक्कम गुगल पे करण्यात आली.

या ग्रुप मध्ये आप्पा कल्याणकर, स्वप्निल कल्याणकर, अनिरुद्र लवेकर, साई डंबे, उद्धव महाडिक, आदित्य महाडिक, भूषण चव्हाण, छोट्या कल्याणकर, मनीष पिसे, मनोज पाटील, निखिल पिसे, निलेश सोरप, पप्या कल्याणकर, सचिन पावसकर, सागर डंबे हे तरुण युवक असून अशा प्रकारच्या गरजू कुटुंबाला अथवा संस्थेला या ग्रुप कडून मदत केली जाते. या मदतीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *