देवगड (प्रतिनीधी)
तीन्ही तालुक्यातील तहसिलदार , कर्मचारी यांनी एकत्र येत केला उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांचा सत्कार
महाराष्ट्र राज्य विधानसभा २०२४ निवडणूका ते महाराष्ट्र सरकार नव्याने स्थापित होईस्तवर निवडणूक प्रक्रियेतील महसूल कर्मचारी अधिकारी यांची महत्वपुर्ण भूमिका तसेच जबाबदारी असते. राज्याचे लक्षलागून राहिलेल्या कणकवली विधानसभा मतदार संघात निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णयअधिकारी जगदीश काटकर यांच्या कार्यकुशल नेतृत्वामुळे सुरळीत पार पडली. यामुळे या मतदारसंघात समाविष्ठ असलेल्या देवगड, कणकवली आणि वैभववाडी या तीन्ही तालुक्यातील कर्मचा-यांनी सुटकेचा नि:श्र्वास टाकला होता. महाराष्ट्र राज्याचे सरकार अस्थित्वात येताच कणकवली प्रांतात समाविष्ठ असलेल्या तीन्ही तालुक्यातील तहसिलदार अणि कर्मचारी यांनी एकत्र येत उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांचा शाल,श्रीफळ ,पुष्पगच्छ देवून सत्कार केला.
या सत्कार प्रसंगी बोलताना प्रांताधिकारी जगदीश कातकार यांनी कणकवली विधानसभा मतदार संघाची निवडणू सुरळीत पार पाडण्यासाठी कार्यकुशल अधिकारी पेक्षा कर्मचारी वर्गाचे भरीव सहकार्य अधिक महात्वाचे ठरले. तुमच्या सहाकार्यामुळेच अशी प्रकिया सुरळीत पारपाडणे मला शक्य झाले अशी भावना व्यक्त केली. यावेळी त्यांनी देवगड, कणकवली,वैभववाडी तालुक्यातील सर्व राजकीय नेते,पुढारी,मतदार, विविध संघटना, लाईव्ह-प्रिंट मेडिया पत्रकार यांचे आभार मानत जिल्हाधिकारी श्री.पाटील यांना देखील धन्यवाद दिले.
वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणवली येते सायंकाळी उशीरा पारपडलेल्या सत्कार,आभार,प्रिती भोजन कार्यक्रम प्रसंगी तीन्ही तालुक्यातील अधिकारी कर्मचारीमोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी कर्मचारी वर्गाने आपल्या सुप्त कलेला वाव देत गीत गायन करत उपस्थितांचे मनोरंजन केले.
