वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड- पेंडुर येथील श्री देव घोडेमुख देवस्थान चा वार्षिक जत्रोत्सव आज भक्तिमय वातावरणात संपन्न

 

वेंगुर्ला (मंगल कामत)

वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड- पेंडुर येथील श्री देव घोडेमुख देवस्थान चा वार्षिक जत्रोत्सव आज भक्तिमय वातावरणात संपन्न

दक्षिण कोकणातील जागृत व प्रसिद्ध देवस्थान असलेले वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड- पेंडुर येथील श्री देव घोडेमुख देवस्थान चा वार्षिक जत्रोत्सव आज भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या जत्रोत्सवाला सकाळपासून भाविकांनी गर्दी करत देवाचे दर्शन घेतले.
भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या शिवमार्तंडेश्वर, ३६० चाळ्यांचा अधिपती श्री घोडेमुख च्या जत्रोत्सवाला आज भाविकांचा जनसागर लोटला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाहित मुंबई,गोवा, कर्नाटक, कोल्हापूर, व इतर भागातील भाविकांनी सकाळपासून गर्दी करत घोडेमुखाचे दर्शन घेऊन देवाला केळी, नारळ अर्पण केले. निसर्गरम्य परिसर व डोंगराच्या एका टोकावर वसलेल्या या श्री देव घोडेमुखाचे भाविकांनी सुमारे ७०० ते ८०० मीटर डोंगर चडून दर्शन घेतले. या उत्सवात लाखो भाविकांनी आपली उपस्थिती दर्शवत काहींनी मंदिरात तर काहींनी प्रवेशव्दारावर केळी, नारळ ठेवले. दुपारी मातोंड सातेरी मंदिर येथून तरंग देवतांचे आगमन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या जत्रोत्सवाला सुरुवात झाली. देवस्वाऱ्या डोंगर चढून घोडेमुख मंदिरात पोचल्यानंतर सालाबात धार्मिक विधिना सुरुवात झाली.
यानंतर गावकाऱ्यांकडून श्री घोडेमुखला नारळाचा मान तर श्री देव घोडेमुखच्या चाळ्यांंना गावकरी मानकरी यांनी प्रथेप्रमाणे कोंब्याचा मान दिला. यानंतर भाविकांकडून आलेल्या सुमारे ५० ते ६० हजार कोंब्याचा बळी देण्यात आला. दरम्यान सायंकाळी देवस्वाऱ्या अवसारी परत सातेरी मंदिराकडे निघाल्यानंतर या जत्रोत्सवाची सांगता झाली. या जत्रोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वेंगुर्ला पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली २ पोलिस अधिकारी, 21 पोलीस कर्मचारी, 11 होमगार्ड व आरसीबी पथक यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *