देवगड,दि.२२ नोव्हेंबर
जामसंडे भटवाडी माळरानावर आग ; नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य
जामसंडे शहरालगत असलेल्या भटवाडी रस्त्यालगत असलेल्या माळरानावर दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागून मोठे नुकसान झाले.नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाच्या सहाय्याने अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात नगरपंचायत कर्मचाऱ्यांना यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार,भटवाडी रस्त्यालगत असलेल्या माळरानावर मोठ्या प्रमाणात गवत सुकले होते अचानक 2.30 वाजण्याच्या सुमारास आग येणे रुद्र रूप धारण केले होते सदर घटना याच रस्त्याने जाताना नगरसेवक तेजस मामघाडी यांना निदर्शनास आली त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगेवर नियंत्रण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु आजूबाजूच्या घरांना झळ पोचू नये यासाठी त्याने शर्तीचे प्रयत्न केले.
मात्र नगरसेवक तेजस मामघाडी यांच्या निदर्शनास आले की आग आटोक्यात आणणे शक्य नाही त्यांनी तत्काळ नगरपंचायत प्रशासनाला फोन करून अग्निशमन बंब पाचारण केले लागलीच नगरपंचायतीचा अग्निशमन बंबा घटनास्थळी दाखल होऊन अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले.
