कणकवली दि २२ नोव्हेंबर (प्रतिनिधी)
अन्यायाविरुद्ध लढा देणारे आणि संघर्ष करणारे सत्यविजय भिसे नेहमीच समाजाच्या पाठीशी राहिलेत – आमदार वैभव नाईक
शिवडाव येथे कै. सत्यविजय भिसे यांचा २२ वा. स्मृतिदिन साजरा
सत्यविजय भिसे यांची २२ वर्षांपूर्वी निर्घृणपणे हत्या झाली.त्याचे दुःख अजूनही जनतेच्या मनात आहे. सत्यविजय भिसे हे समाज कार्यात अग्रेसर होते. सामाजिक बांधिलकी जपणारे सेवाभावी व्यक्तीमत्व अशी ओळख त्यांनी आपल्या सामाजिक कार्यातुन निर्माण केली. ते लढवय्या कार्यकर्ते होते. अन्यायाविरुद्ध लढा देणारे आणि संघर्ष करणारे सत्यविजय भिसे नेहमीच समाजाच्या पाठीशी राहिलेत.म्हणुनच त्यांच्या कार्याचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा. असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी शिवडाव येथे केले .सत्यविजय भिसे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर,माजी जि.प.सदस्य बाळा भिसे, उद्योजक शंकर पार्सेकर, दिनेश नाडकर्णी, रंजन चिके, शिवडाव सरपंच नितीश भिसे, उपसरपंच सायली तेली, विलास गावकर, संजय पारकर,सचिन आचरेकर , शिरवल सोसायटीचे चेअरमन रविकांत सावंत, शिवसेना कळसुली विभाग प्रमुख चंदु परब,शिरवल उपसरपंच प्रवीण तांबे, वनिता जाधव, कै. सत्यविजय भिसे मित्र मंडळाचे अध्यक्ष सत्यवान जाधव, रवी राणे,लवू वाळके,लवू पवार,मधुकर चव्हाण,शिवडाव तंटामुक्ती अध्यक्ष बंडू लाड,सत्यविजय जाधव, भारती देसाई , वैशाली पाटील, श्रीकांत तेली , नितीन हरमलकर, नितिन गावकर,गणेश शिवडावकर, सुनील हरमलकर, गणंजय तेली, निकेतन भिसे, दीपक कोरगावकर, महेश शिरसाट,संतोष मुरकर, बाबू परब, प्रेमानंद कोरगावकर, प्रमोद नानचे,नंदू परब, संतोष दळवी, गणेश म्हसकर, कृष्णा चाळके, संदीप शिरसाट, काशिनाथ गावकर सत्यविजय भिसे प्रेमी आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आमदार नाईक म्हणाले की,आम्ही त्यांच्यासोबत कार्यरत होतो. गरीब गरजू कुटुंबाला मदत करण्याचे काम त्यांनी केले होते. दुर्दैवाने आज ते आपल्यात नाहीत. त्यांना अपेक्षित असलेले काम आपण सर्वांनी केले पाहिजे.भिसे कुटुंबीय आणि सत्यविजय भिसे मित्रमंडळ विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा स्मृतिदिन साजरा करीत असून त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव राहू असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले.
शिवडाव येथे कै. सत्यविजय भिसे यांचा आज २२ वा. स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.त्यात ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच वारकरी संप्रदायातील ५० वारकऱ्यांचा आम. वैभव नाईक शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर माजी, जि. प. सदस्य बाळा भिसे,उद्योजक शंकर पार्सेकर आदी मान्यवरांच्या हस्ते शाल , श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

