देवगड (प्रतिनिधी)
किंजवडे मतदान केंद्रावर सकाळीच मतदारांची गर्दी , मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मुंबई स्थित चाकरमानी गावी दाखल
विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेस सकाळी सात वाजल्यापासून शांततेत सुरुवात झाली असून सर्व मतदान केंद्रावर शांततेत मतदान देवगड तालुक्यात सुरू आहे काही मतदान केंद्रावर सकाळीच मतदारांची गर्दी पाहायला मिळाली. किंजवडे मतदार केंद्रावर युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, भाजप नेते संतोष किंजवडेकर जामसंडे येथील मतदान केंद्रावर नगरसेवक शरद ठुकरुल, माजी आमदार अँड अजित गोगटे, अँड अविनाश माणगावकर यांनी कुटुंबीयांसमवेत तर सामाजिक कार्यकर्ते विनायक शेठ पारकर यांनी वरेरी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
