जिल्ह्यात तिन्ही जागांवर महायुतीचा एकतर्फी विजय होणार : अशोक दळवी

 

सावंतवाडी (प्रतिनिधी)

जिल्ह्यात तिन्ही जागांवर महायुतीचा एकतर्फी विजय होणार : अशोक दळवी

विधानसभा निवडणूकीत महायुतीच्या झंजावाता पुढे महाविकास आघाडी चारी मुंड्याचीत होणार आहे. जिल्ह्यातील तिन्ही जागावर महायुतीचा विजय होणार असल्याचा ठाम विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी व्यक्त केला. सावंतवाडी , वेंगुर्ले , दोडामार्ग विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दीपक केसरकर , कुडाळ मालवणचे निलेश राणे व कणकवली देवगड , वैभववाडी चे नितेश राणे तिन्ही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील, असेही दळवी म्हणाले.

 

दळवी पुढे म्हणाले, आम्हाला खात्री आहे मतमोजणीवेळी पहिल्या फेरीपासून केसरकारांची सुरू होणारी आघाडी शेवटपर्यंत तशीच राहील व अंतिम निकाल वेळी मोठ्या मताधिक्याने त्यांचा विजय झालेला असेल.

कुडाळ , मालवण मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी आपल्या खासदारकीच्या कालावधीत नजरेत भरण्यायोग्य काम केले होते. निलेश राणे यांचा विजय त्या ठिकाणी निश्चित आहे. कणकवली , देवगड , वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे हॅट्रिकसाठी सज्ज झाले आहेत. सर्वात प्रभावशाली युवा आमदार म्हणून त्यांची प्रतिमा राज्यात आहे. त्यांचा विजय हा सुद्धा एकतर्फीच असेल असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी व्यक्त केला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *