सावंतवाडी (प्रतिनिधी)
सावंतवाडी मतदारसंघातील ३१० केंद्रावर कर्मचारी रवाना निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. आज पासून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याबाबत तयारी सुरू केली असून 270 सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आज सकाळपासूनच मतदार संघातील एकूण 310 मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचाऱ्यांना पाठवण्यास सुरुवात झाली. या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत श्री. हेमंत निकम आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्री. श्रीधर पाटील यांनी नियोजन केले असून निवडणूक कर्मचाऱ्यांना निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन व इतर सामुग्री कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आली. यावेळी पोलीस अधिकारी उपस्थित होते. सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांना पोलिसां सोबत त्यांना नेमून देण्यात आलेल्या मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले. 38 एसटी गाड्या व तीन मिनी बसेसद्वारे या मतदारसंघातील सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले या तिन्ही तालुक्यातील 390 मतदान केंद्रावर हे कर्मचारी रवाना झाले.
