oplus_0

देवगड जामसंडे शहरवासियांनी पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्या – आमदार नितेश राणे

देवगड (प्रतिनिधी)

 

देवगड जामसंडे शहरवासियांनी पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्या – आमदार नितेश राणे

गेली दहा वर्ष लोकप्रतिनिधीम्हणून सेवा करण्याची संधी दिली. पहिल्यांदाच देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणूक लढविली त्यावेळी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला देवगड जामसंडे शहराला लोकप्रिय शहर बनविण्याच्या दृष्टीने व्यापार वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कार्यक्रम घेतले तसेच पर्यटनात्मक प्रकल्प राबविले त्यामुळे देवगड जामसंडे शहराला वेगळं नाव लोकप्रियता मिळाली व लोकांचे आकर्षण वाढलंय असे मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले

oplus_0

महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ देवगड जामसंडे शहरात काढलेल्या प्रचार पदयात्रेदरम्यान त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी माजी आमदार एडवोकेट अजित गोगटे ,भाजपा जिल्हा पदाधिकारी बाळाकडे, शहराध्यक्ष योगेश पाटकर,युवा मोर्चा दयानंद पाटील, माजी नगराध्यक्ष योगेश चादोस्कर, प्रियांका साळसकर, उष: कला केळुसकर,गटनेते शरद ठुकरूल,उमेश कणेरकर,नरेश डामरी, अमोद फडके,भाजपा नगरसेवक ,नगरसेविका, राजेंद्र वालकर,व्ही सी खडपकर, यश रानडे, शामराव पाटील, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

oplus_0

राणे पुढे म्हणाले ,आता दहा वर्षांनी मी तिसऱ्यांदा आपला आशीर्वाद मागण्यासाठी येतोय या निमित्ताने माझ्या शहरवासीयांना एक शब्द द्यायचा आहे देवगड जामसंडे शहरातील पाणी प्रश्न गंभीर आहे व याची मला जाणीव देखील आहे हा हा पाण्याचा प्रश्न राजकीय इच्छाशक्तीमुळे सुटू शकतो इतका विश्वास मी तुम्हाला देतोय . दहा वर्ष मला संधी दिला त्याचप्रमाणे पुन्हा एकदा संधी द्या.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीर्बादेवीचे दर्शन घेऊन या पदयात्रेची सुरुवात आमदार नितेश राणे यांनी केली दीर्बादेवी मंदिर ते मांजरेकर नाका अशी ही पदयात्रा काढण्यात आली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *