बांदा येथे इलेक्ट्रॉनिक वजनकाटे पडताळणी कँप
बांदा (प्रतिनिधी) १८ जुलै २०२४
निरीक्षक वैधमापनशास्त्र सावंतवाडी विभागाच्या वतीने शनिवार दि. 20 जुलै ते मंगळवार 23 जुलै या कालावधीत बांदा शहर व पंचक्रोशीसाठी इलेक्ट्रॉनिक वजनकाटे मुद्रांक पडताळणी कँपचे बांदा व्यापारी भुवन येथिल श्री विठ्ठल रखुमाई मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे.तरी व्यापारी वर्गाने आपले इलेक्ट्रॉनिक वजनकाटे पडताळणीसाठी आणावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
