भुईबावडा घाटातल्या मोरीचे बांधकाम त्वरीत करा ; कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी केली घाटरस्ता दुरुस्ती कामाची पाहणी

0 minutes, 0 seconds Read

 

वैभववाडी (प्रतिनिधी) 

 

भुईबावडा घाटातल्या मोरीचे बांधकाम त्वरीत करा ; कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी केली घाटरस्ता दुरुस्ती कामाची पाहणी

भुईबावडा घाटात कोसळलेल्या मोरीची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगौड यांनी केली. काम लवकरात लवकर पूर्ण करून वाहतूक सुरु करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकारी व ठेकेदार यांना केली आहे.

भुईबावडा घाटात 26 सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. तसेच एक मोरी कोसळली आहे. तातडीने कोसळलेल्या दरडी हटवून रस्ता मोकळा करून घाटातून हलकी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. मात्र मोरी कोसळल्यामुळे एस टी बससह अवजड वाहतूक गेले १२ दिवस वाहतूक बंद आहे. तर करूळ घाटही नूतनीकरणाच्या नावाखाली तब्बल नऊ महिने बंद आहे. त्यामुळे प्रवाशी, वाहतूकदार, व्यापारी यांची मोठी गैरसोय झाली आहे.

भुईबावडा घाटातील कोसळलेल्या मोरीसह संपूर्ण घाटाची त्यांनी पाहणी केली आहे. मोरीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना त्यांनी अधिकारी व ठेकेदार यांना केली आहे. यावेळी उपभियंता विजय जोशी, व अधिकारी उपस्थित होते.

भुईबावडा घाटात कोसळलेल्या मोरीचे सिमेंट काँक्रीट बांधकाम सुरू आहे. मोरीची संरक्षण भिंत दरीतून आठ मीटर उंच बांधण्यात येणार असून सध्या तीन मीटर उंचीचे बांधकाम झाले आहे. येत्या चार-पाच दिवसात काम पूर्ण करून वाहतूक सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विजय जोशी यांनी सांगितले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *