अनिकेत विचलित होऊ नका!वादळ पचविण्यासाठी तयार रहा !! परमेश्वर तुमच्या पाठीशी उभा आहे !

0 minutes, 0 seconds Read

 

अनिकेत विचलित होऊ नका!वादळ पचविण्यासाठी तयार रहा !! परमेश्वर तुमच्या पाठीशी उभा आहे!!!

सिंधुदुर्ग  

कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी आपले मनोगत व्यक्त केले आहे.कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड म्हणतात की, आदरणीय अनिकेत विचलित होऊ नका!वादळ पचविण्यासाठी तयार रहा !! परमेश्वर तुमच्या पाठीशी उभा राहिला !!! अनिकेत पटवर्धन म्हणजे आगळे वेगळे व्यक्तिमत्त्व होय.त्यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर मूर्ती लहान पन कीर्ती महान होय, बरेच जण बोलतात की महाराष्ट्र राज्याचे बांधकाम खाते गतिमान अणि पारदर्शक करणारे बांधकाम मंत्री आदरणीय रविन्द्र चव्हाण साहेब यांचे ते स्विय सहाय्यक आहेत पन मी म्हणेन मित्र हो ते बांधकाम मंत्री महोदय यांची अनिकेत जी सावली आहे. अनिकेत जी दिवस रात्र मंत्री महोदय यांची सावली म्हणुन काम करत आहेत. आदरणीय बांधकाम मंत्री चव्हाण साहेब रात्रंदिवस काम करीत आहेत झोप हा प्रकार त्यांना माहीत नाही केवळ एकाच ध्यास बांधकाम खाते गतिमान अणि पारदर्शक करणे अणि राष्ट्राच्या हितासाठी, गोर गरीब लोकांच्या हितासाठी कल्याणासाठी झटने एवढेच आहे..मित्रहो हे दोघेही दिवसरात्र खर्या अर्थाने प्रखर राष्ट्रवादने झपाटलेले आहेत यांच्या दोघांच्या नसानसात राष्ट्र प्रेम राष्ट्र भक्ती आहे…बांधकाम खात्यामध्ये एवढी मोठी अभूतपूर्व भरती झाली एकदम पारदर्शक झाली याबाबत राज्यात कुणीही उन्गळीनिर्देश केला नाही हे विशेष होय..मंत्री महोदय अणि त्याचे निकटवर्तीय अनिकेत जी कुणाचा चहा सुधा घेतला नाही हे संपूर्ण राज्याला माहीत आहे. राज्यात 56000 कोटी पेक्षा जास्त रक्कम चि कामे मंजूर झाली त्याची टेंडर सुद्धा झाली तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत 3560 कोटीची कामे मार्गी लावली तरीसुद्धा टेंडर प्रकिया मध्ये कधी हस्तक्षेप केला नाही कधी कुणाला टेंडर किवा देऊ नका असा साधा मंत्री महोदय आणि अनिकेत जी यांनी फोन सुद्धा कधी केला नाही शिवाय कुणाचा चहा सुद्धा घेतला नाही. जवळ नातेवाईक पक्षातील कार्यकर्ते यांना सुद्धा एकादे टेंडर दिले नाही हे विशेष आहे आदरणीय बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चव्हाण साहेब अणि अनिकेत जी ज्या ज्या वेली दौर्‍यावर येत असतात त्या त्या वेली मंत्री महोदय स्वतः अनिकेत साहेब अणि त्याचा सुरक्षा वर्ग कधी कुणाचा चहा सुद्धा घेत नाहीत अहो हे तर सोडाच मंत्री महोदय त्याच्या सर्व कर्मचारी अनिकेत साहेब यांच्या काळात एवढ्या बदल्या झाल्या पन कुणा कडून ही कुणी चहा सुद्धा घेतला नाही..त्याचे कारण मंत्री महोदय हे गतिमान अणि पारदर्शक कारभाराचे पुरस्कर्ते आहेत त्याच्या नसानसांत खर्या अर्थाने राष्ट्रवाद ठासून भरला आहे . आदरणीय रविन्द्र चव्हाण साहेब अनिकेत जी पटवर्धन यांची जडणघडण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत अणि मुशीत झाली आहे हेच एकमेव कारण आहे. प्रखर देशभक्त, प्रखर राष्ट्रवादी राज्याचा हितासाठी अविरत पणे झटणारे आदरणीय रविन्द्र चव्हाण साहेब अणि त्याची सावली म्हणुन काम करणारे अनिकेत जी पटवर्धन हे सुद्धा देशभक्त अणि प्रखर राष्ट्रवादी आहेत यांच्या दोघांच्या नसानसातून राष्ट्र प्रेम वाहत आहे हे मात्र नक्की..एक दुर्दैवी घटना घडली त्याचे राजकीय भांडवल झाले अणि या दुर्दैवी घटना चा पुरेपूर गैरफायदा घेणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकच व्यक्ती ज्याचे पोट माहितीच्या अधिकारावर चालते ज्याला जिल्हा मध्ये पत्रकार बांधावा च्या पत्रकार परिषद व्यतिरिक्त कोणी ही कुत्रे ही त्याला जवळ करीत नाही ज्याचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात घराघरात blackmailer म्हणुन च उल्लेख जातो असा खोटारडा व्यक्ती अनिकेत जी तुमच्या वर खोटे नाटे फालतू आरोप करू लागला आहे ही बाब खूप वेदनादायी आहे हे मात्र नक्की..आदरणीय रविन्द्र चव्हाण साहेब अणि तुमचा कारभार सूर्यप्रकाश इतका स्वछ आहे यात काही शंका नाही सूर्य कडे थुंकणाराला लोक हसतात पण तुम्ही त्याची चिंता अजिबात करू नये ही विनंती मंत्री महोदय अणि अनिकेत जी तुमची या राज्याला देशाला अणि माझ्या या कोकणाला नितांत गरजच आहे तुमच्या नसानसात राष्ट्र प्रेम आहे राष्ट्राचे हित आहे तुमचे महान कार्य असेच अविरत पणे सुरू राहू द्या ..अणि जाता जाता विनम्र पणे एकच सांगू इच्छितो अनिकेत जी तुम्ही विचलित होऊ नका! वादळ पचविण्यासाठी तयार व्हा!!परमेश्वर तुमच्या पाठीशी उभा आहे!!

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *