वाहतूक प्रशासनाचा अजब कारभार गाडी मुंबईला गेलीच नाही तरीही आला 2000 दंड

0 minutes, 1 second Read

सावंतवाडी – प्रतिनिधी

 

वाहतूक प्रशासनाचा अजब कारभार गाडी मुंबईला गेलीच नाही तरीही आला 2000 दंड

 

आपली गाडी कधीही मुंबईला नेण्यात आलेली नसताना मुंबईच्या एका महामार्गावर मर्यादित वेगापेक्षा अधिक वेगाने गाडी चालविल्याबद्दल २ हजाराचा दंड महाराष्ट्र वाहतूक पोलीस प्रशासनाने आपल्याला ठोठावला आहे, अशी माहिती मिठबाव येथील ज्येष्ठ नागरिक सुभाष धोंडू शिरवडकर यांनी दिली आहे. या दंड वसुलीसाठी राष्ट्रीय लोकअदालतीमार्फत आपणाला नोटीसही बजाविण्यात आली असून या नोटीसीमुळे आपणाला नाहक मनस्ताप झाला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

 

श्री. शिरवडकर यांच्या मालकीची गाडी सुझुकी कंपनीची असून मॉडेल अल्टो के-१० आहे. त्या गाडीचा नंबर एमएच ०७, एजी ३३६३ असा आहे. तर बजाविण्यात आलेल्या नोटीशीतील गाडीचा नंबर एमएच ०७, एजी ३३६३ असा दर्शविण्यात आला असला तरी सुझुकी कंपनीच्या या गाडीचे मॉडेल वेगळे दिसत आहे. तसेच आपली गाडी व दंड ठोठावण्यात आलेली गाडी या दोन्ही गाड्यांचे रजिस्ट्रेशन सिंधुदुर्गचेच असून केवळ महामार्गावरील डिजिटल कॅमेरांनी फुसटशा नंबर प्लेटवरून अधोरेखित केलेल्या नंबरच्या आधारे आपल्याला दंडाची नोटीस बजाविण्यात आल्याचे शिरवडकर यांचे म्हणणे आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *