राधिका सोनाळकर हिचे सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन स्पर्धेत यश 

0 minutes, 1 second Read

 

 

सावंतवाडी (प्रतिनिधी)

राधिका सोनाळकर हिचे सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन स्पर्धेत यश 

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी या प्रशालेत इयत्ता नववीत शिकणारी विद्यार्थिनी कु.राधिका विश्वास सोनाळकर हिने सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन तर्फे आयोजित जिल्हा निवड चाचणी 2025 मध्ये आपले क्रीडा कौशल्य दाखवत उपविजेतेपद पटकावले.

 

 

तिच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत ,डॉ. सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *