प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत हिंदी साहित्याने भारतीय समाजाला योग्य दिशा दिलीय – विनायक ठाकूर

0 minutes, 0 seconds Read

देवगड (स्वप्नील लोके)

प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत हिंदी साहित्याने भारतीय समाजाला योग्य दिशा दिलीय – विनायक ठाकूर

जामसंडे श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूलमध्ये हिंदी दिवस साजरा

हिंदी दिवस केवळ हिंदी भाषेच्या प्रतिष्ठेचे प्रतीक नसून देशाच्या सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहे .भारता मध्ये हिंदी साहित्याचे खूप मोठे योगदान असून प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत हिंदी साहित्याने भारतीय समाजाला योग्य दिशा दिली असल्याचे प्रतिपादन जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेतील जेष्ठ हिंदी विषय शिक्षक श्री.विनायक पांडुरंग ठाकूर यांनी केले .
जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा हिंदी दिवस समारंभात ते बोलत होते.
यावेळी विचार मंचावर जेष्ठ शिक्षक श्री.सुनील जाधव ,श्री.संजय पांचाळ, श्रीमती.संजीवनी जाधव ,सौ.समीरा राऊत ,श्री.मंगेश गिरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना जेष्ठ शिक्षक सुनील जाधव म्हणाले की , हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करून आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण करून देणे हा राष्ट्रभाषा हिंदी दिन साजरा करण्यापाठीमागचा उद्देश असल्याचे सांगत युवा वर्गाला हिंदीचे महत्व पटवून देण्यासाठी हिंदी दिनाचे अनन्यसाधारण महत्व दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी हिंदी दिनाचे महत्त्व सांगणाऱ्या कथा ,कविता ,निबंध ,संवाद यांचे विद्यार्थ्यानी सादरीकरण केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक ,व सूत्रसंचालन मंगेश गिरकर यांनी करून शेवटी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *