दोडामार्ग (प्रतिनिधी) १५ जुलै २०२४
शाब्दिक चकमकीचे दगडफेकीत रूपांतर वाद सोडविण्यासाठी गेलेले नगराध्यक्ष चेतन चव्हाण जखमी ; दोडामार्ग तालुक्यातील घटना
स्थानिक व कर्नाटक युवकामधील वाद ; दोडामार्ग मांगेली धबधबा येथील प्रकार
पर्यटकांचे आकर्षण असलेल्या वर्षा पर्यटनाच्या पर्यटनाची ठिकाणी सध्या वादग्रस्त ठरत आहेत. देवगड तळवडे न्हावनकोंड पाठोपाठ आता दोडामार्ग मांगेली धबधब्यावर हे असाच प्रकार घडल्याने पोलीस व स्थानिक प्रशासनासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दोडामार्ग तालुक्यातील मांगेली येथील धबधब्यावर स्थानिक युवक व कर्नाटक येथील युवकांमध्ये शाब्दिक चकमक झाली.याचे रूपांतर मोठ्या भांडणात होऊन रागाने कर्नाटकच्या युवकांनी केलेल्या दगडफेकीत भांडण सोडविण्यासाठी गेलेले दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण या घटनेत जखमी झाले असून त्याना 6 टाके पडले आहेत.ही घटना आज सोमवारी सायंकाळी घडली.या घटनेची पोलिसात तक्रार करण्यात आली असून दगडफेक करणाऱ्या युवकांचा पोलीस शोध घेत आहेत.जखमी नगराध्यक्ष चव्हाण यांची माजी आमदार राजन तेली यांनी फोन वरून विचारपूस केली.
