शेर्ले येथे घरावर फणसाचे झाड पडुन तीन लाखांचे नुकसान

0 minutes, 0 seconds Read

शेर्ले येथे घरावर फणसाचे झाड पडुन तीन लाखांचे नुकसान

 

बांदा (मंगल कामत) १५ जुलै २०२४

 

शेर्ले शेटकरवाडी येथील अनिता पालव यांच्या घरावर फणसाचे झाड कोसळल्याने पालव यांचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना आज दुपारी घडली. ही माहिती शेर्लेचे माजी सरपंच उदय धुरी यांनी दिली.
बांदा परिसरात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. शेर्ले येथील पालव यांच्या घरानजीक असलेले भलेमोठे फणसाचे झाड पालव यांच्या घरावर कोसळले. यामध्ये घराच्या छपराचे तसेच व घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत झाड बाजूला केले.या मदत कार्यात माजी सरपंच उदय धुरी श्याम सावंत ग्रामपंचायत सदस्य दीपक गोवेकर लवु सावळ अरुण धुरी गौरेश जाधव आना धुरी लवु सावळ दीपक गोवेकर आदी ग्रामस्थांनी मदत कार्य केले

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *