नवरात्र उत्सवानिमित्त ३ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत कातवण येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
कातवण येथील तरुण उत्साही ग्रामस्थ मंडळाच्यावतीने ३ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत सार्वजनिक नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सव कालावधीत भव्य रक्तदान शिबीर, तिरंगी डबलबारी भजनांचा सामना, महिलांचा फुगडी कार्यक्रम, जिल्हास्तरीय ढोलवादन स्पर्धा, खेळ पैठणीचा कार्यक्रम, स्थानिक दिंडी कार्यक्रम, महिला व पुरुष डबलबारी भजनाचा जंगी सामना, सत्यनारायणाची महापूजा असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
सार्वजनिक नवरात्री उत्सवानिमित्त ३ रोजी सकाळी १० वा. मूर्ती प्रतिष्ठापना, आरती, तिर्थप्रसाद, सायंकाळी ५ वा. पालखी परिक्रमा. ४ रोजी ९ वा. भव्य रक्तदान शिबीर, सायंकाळी ५ वा. पालखी परिक्रमा. ५ रोजी सायंकाळी ५ वा. पालखी परिक्रमा. ६ रोजी रात्री १० वा. बुवा दिनेश वागदेकर, बुवा विजय उर्फ गुंडू सावंत, बुवा उदय पारकर यांच्यात तिरंगी डबलबारी भजनाचा जंगी सामना. ७ रोजी दुपारी १२ वा. महाप्रसाद, ३ वा. महिलांसाठी हळदीकुंकू, रात्री १० वा. महिलांचा फुगडी कार्यक्रम होणार आहे. ८ रोजी रात्री १० वा. छ. शिवाजी चौक मित्रमंडळ – कातवण पुरस्कृत ढोलवादन स्पर्धा होणार आहे. यातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकांना अनुक्रमे ११ हजार रू., ५ हजार रू., ३ हजार रू. व कायमस्वरुपी चषक देण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या नाव नोंदणीसाठी सिताराम जोईल (८०८०४२६०३०) व अमेय धुरी (८०८०१२०११२) यांच्याशी संपर्क साधावा. ९ रोजी रात्री १० वा. खेळ पैठणीचा कार्यक्रम. १० रोजी रात्री १० वा. स्थानिक दिंडी कार्यक्रम. ११ रोजी रात्री १० वा. बुवा श्रीकांत शिरसाट विरुद्ध बुवा रिया मेस्त्री यांच्यात पुरुष व महिला डबलबारी भजनाचा सामना होणार आहे. १२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, आरती व तिर्थप्रसाद, रात्री १० वा. टॅलेंट बॉक्स इव्हेन्ट, मुंबई निर्मित ‘लोकोत्सव… मराठी संस्कृतीचा व परपरांचा’ हा लोकसंगीत, नृत्याने बहरलेल्या संस्कृतीच्या कलाविष्काराचे सादरीकरण होणार आहे. १३ रोजी दुपारी ३.३० वा. महाआरती, सायंकाळी ४ वा. श्री अंबामातेची लेझिम ढोलपथकाच्या गजरात भव्य मिरवणूक व विसर्जन सोहळा होणार आहे. नवरात्र उत्सव कालावधीत दररोज सायंकाळी ७ वा. महाआरती, रात्री ८ वा. स्थानिक भजने, रात्री ९ वा. स्थानिक दांडिया नृत्याचे सादरीकरण होणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तरुण उत्साही ग्रामस्थ मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.