ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने देवगड, जामसंडे शहराचा पाणी पुरवठा पुढील दोन ते तीन दिवस राहणार बंद

 

देवगड – प्रतिनिधी

 

ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने देवगड, जामसंडे शहराचा पाणी पुरवठा पुढील दोन ते तीन दिवस राहणार बंद

दहिबाव पंप हाऊसमधील नगरपंचायत मालकीचा ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने देवगड, जामसंडे शहराचा पाणी पुरवठा पुढील दोन ते तीन दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात देवगड, जामसंडे शहरातील नळग्राहकांवर पाणी समस्येला सामोरे जावे लागणार आहे.

 

देवगड, जामसंडे शहरासाठी दहिबाव नळयोजनेवरून पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र, नळयोजनेबाबत समस्या कायम निर्माण होत असून दहिबाव पंप हाऊसमधील नगरपंचायत मालकीचा ट्रान्सफार्मरच नादुरुस्त झाल्याने देवगड, जामसंडे शहरातील

नळग्राहकांना किमान दोन ते तीन दिवस पाणी समस्येला सामोरे जावे लागणार आहे. नादुरुस्त झालेला ट्रान्सफार्मर शुक्रवारी सायंकाळी कोल्हापूरला पाठविण्यात आला. हा ट्रान्सफार्मर दुरुस्तीसाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. या ट्रान्सफार्मरच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *