देवगड (स्वप्नील लोके)
आरे ग्रामपंचायतीने व गावाने पाणी , स्वच्छता व आरोग्य बाबत राबवलेल्या उपक्रमाचे केंद्रीय समितीने केले कौतुक
जलजीवन मिशन व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत तपासणीसाठी आरे गावात केंद्रीय समितीतील अधिकारी हसनउद्दीन पठाण व संजीवकुमार चढ्ढा यांनी भेट देत केंद्रीय समितीने जल जीवन मिशन अंतर्गत कामे तसेच स्वच्छ भारत अभियान ग्रामीन अंतर्गत हागणदारीमुक्त अधिक अंतर्गत राबवलेल्या उपक्रमांची पाहणी केली. व राबवलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.
यावेळी जिल्हा परीषद पाणी व स्वच्छता विभागाचे अधिकारी , कर्मचारी , पं.स देवगडचे अधिकारी , कर्मचारी , ग्रामीण पाणी पुरवठा देवगडचे अधिकारी , कर्मचारी , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , तसेच आरे गावचे सरपंच ममता सतीश कदम, उपसरपंच रत्नदीप दयाळ कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते महेश पाटोळे, माजी पंचायत समिती सदस्य अजित कांबळे, ग्रा. पं. सदस्य सत्यवान पाटोळे, सुनील खरात, सोनिया विशाल पोयरेकर, राजश्री मुणगेकर, आरे ग्रामसेवक केतन जाधव, पोलीस पाटील राजेंद्र कदम, बचत गट महिला पदाधिकारी, पाणीपुरवठा व स्वच्छता कमिटी सदस्य, आरोग्य सेविका भारती राणे, अंगणवाडी सेविका अपेक्षा कोकम, प्रगती मेस्त्री, आशा सेविका प्रेरणा अजित कांबळे , मंगेश मुणगेकर, शमिन साईल, सुमित कदम, हेमांग कदम,बाळा मुणगेकर तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी सरपंच व आरे गाव तंटामुक्ती अध्यक्ष महेश पाटोळे , तर उपस्थितांचे आभार माजी .पं.स सदस्य अजित कांबळे यांनी व्यक्त केले.
