बांदा (प्रतिनिधी)
इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाईः साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त..
जुना पत्रादावी-बांदा रोड आरोसबाग तिठ्याजवळ अवैधरित्या मद्याची वाहतूक करताना सोलापूर येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई काल रात्री 8 वाज्याण्याच्या सुमारास करण्यात आले असून त्याच्याकडून तब्बल 5,50,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
विशाल गायकवाड (वय 27) रा. सोलापूर असे ताब्यात घेणाऱ्या संशयत आरोपीचे नाव आहे. ही कारवाई इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाकडून करण्यात आली आहे.
