आचरा–अर्जुन बापर्डेकर
फेस्काॅम संलग्न ज्येष्ठ ना.संघ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा यांच्या वतीने आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. याचा लाभ
संघाच्या चाळीस जणांनी घेतला. यावेळी ब्लड पेशर,शुगर तपासणी,ईसीजी ई.तपासण्याकेल्या गेल्या.
यावेळी सत्तर वर्षावरील १६ जेष्ठांना वय वंदना कार्डचेही वाटप करण्यात आले .
सहकार्य केल्याबद्दल अध्यक्ष अशोक कांबळी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी श्रीमती मुजावर,आरोग्य रक्षक शेवाळे, आरोग्यसेविका गावकरआणि इतर सर्व परिचारिका यांचे गुलाब पुष्प देऊन आभार व्यक्त करण्यात आले.या वेळी जेष्ठ नागरिक संघाचे जे एम फर्नांडिस, भिकाजी कदम,वामन परब, कांबळी, यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.


