आजगाव तलाठी कार्यालय येथे मालजी यांचे उपोषण सुरू

0 minutes, 1 second Read

 

सावंतवाडी (प्रतिनिधी)

 

आपल्या विविध मागण्यांकरिता आजगाव भोम येथील प्रकाश भिकाजी मालजी यांनी आजगाव तलाठी कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळीपासून उपोषण छेडले आहे.आपले वडील जिवंत असताना मयत दाखवून त्यांचा वारस तपास केला हा आपल्यावर अन्याय असून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गेली 15 ते 16 वर्ष मी सातत्याने लढा देत आहे.अद्याप पर्यंत त्याला यश आलेले नाही मात्र माझ्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी मी शुक्रवार सकाळपासून आजगाव तलाठी कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडले आहे.

 

या उपोषणातील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत.
आपले वडील भिकाजी पांडुरंग मालजी है हयात असताना मयत दाखवून मयत तारीख १३ एप्रिल १९६० ला वारस तपास केल त्याची सही सुद प्रत मिळावी. तसेच सन २००९ सालापासून झालेले तीन वारस तपास व त्याचे तीन मयत दाखले पोलीस पाटील दाखले सरपंच दाखले व पंचांची नावे मिळवीत.तसेच वरील पेपर देता येत नसतील तर आपण बेकायदेशीर लावलेले सातबारा (खाते) वर लावलेले नाव लगेच काढून देऊन सातबारा मोकळा करावा व स्वयंकुळाच्या आदेशाप्रमाणे पुढील पूर्तता सातबारा वरील नाव कमी करून व्हावी असा आदेश झालेला आहे.

 

मात्र या प्रमाणे मंडल अधिकारी काम करत नाही याला जबाबदार कोण असाही प्रश्न मालजी यांनी उपस्थित केला आहे.मग आपल्या पातळीवर हे काम का करत नाहीत. एकीकडे सर्वसामान्य जनतेला चांगली सेवा मिळावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान असताना दुसरीकडे अशाप्रकारे चुकीचे कागदपत्र करून एखाद्या सर्वसामान्यावर अन्याय होत असेल तर त्याला कोणताही अधिकारी न्याय देत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय दिला तरच खऱ्या अर्थाने अशा अभियान किंवा शासकीय उपक्रमांचे फलित होईल असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *