सावंतवाडी (प्रतिनिधी)
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करणे करिता शासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान उपक्रम राबवण्यात येत आहे.शनिवारी आजगाव धाकोरे येथील काकतकर सभागृहात सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत सदरचे समाधान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
महसूल विभागाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबीर आयोजित केले असून या मध्ये आजगांव, धाकोरे, तिरोडा, नाणोस, मळेवाड, कोंडुरे, आरोंदा, सावरजुवा, भटपावणी, तळवणे, गुळदुवे, किनळे ही गावे सामाविष्ट करण्यात आली आहेत.
या अभियानांतर्गत प्रमुख दिल्या जाणाऱ्या सेवा पुढील
प्रलंबित फेरफार,७/पर मधील चुकांची दुरुस्ती,डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ आणि ८-अ उत्तानाचि वाटप,उत्पन्न, रहिवासी रहिवासी आणि जातीचे प्रमाणपत्र,नॉन-क्रीमिलेअर प्रमाणपत्र,अकृषिक (MA) परवानगी,अकृषिक (MA) तरतुदींबाबत मार्गदर्शन व सुधारणा,नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती,पाणंद सत्र्याच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश,घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज,अॅशीरटेंक आणि पी. एम. किसान नोंदणी,सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाम मंजूर करणे,पूर्णपादन अकृषिक परवानगी प्रकरणी अशा विविध सेवा देण्यात येणार आहेत.
शनिवारी आजगाव धाकोरे येथील काकतकर सभागृहात सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत आयोजित केलेल्या
महाराजस्व छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले असून नागरीकांसाठी जाहीर सुचना: नागरीकांनी शिबिराच्या दिवशी आवश्यक मुळ कागदपत्रे व छायांकित प्रतीसह उपस्थित रहावे असेही आवाहन पाटील यांनी केले आहे.
