सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भाजप गटनेतेपदी संजय बोबडी यांची बिनविरोध निवड ; जिल्हा परिषदेतील भाजपच्या सर्व सदस्यांची उपस्थिती

0 minutes, 0 seconds Read

 

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी)

 

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या भाजप गटनेते पदाची निवड गुरुवारी झाली. गटनेतेपदी संजय बोबडी यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी भाजपाचे सर्वच्या सर्व २७ जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या उपस्थितीत ही निवड झाली.

भारतीय जनता पक्षाचे कमळ चिन्हावर निवडून आलेले अधिकृत संख्याबळ २७ असून यामध्ये श्री प्रमोद पुंडलिक रावराणे, श्रीमती श्रावणी रोहन रावराणे, श्रीमती रिद्धी रितेश सुतार, श्रीमती प्राची देवानंद इस्वलकर, श्री संतोष चंद्रकांत पारकर, श्री मनोज तुळशीदास रावराणे, श्रीमती सुप्रिया संदीप मेस्त्री, श्रीमती शितल अमित दळवी, श्री संदेश श्रीधर सावंत, श्री संजय नामदेव बोबडी, श्रीमती सुयोगी रवींद्र घाडी,

 

श्रीमती अवनी अमोल तेली, श्रीमती अनुराधा महेश नारकर, श्री देवदत्त दामोदर कदम, श्रीमती सावी गंगाराम लोके, श्री सुनील बाळकृष्ण पारकर, श्रीमती क्षमा संदीप हडकर, श्रीमती सुप्रिया संतोष वालावलकर, श्रीमती आरती हरिश्चंद्र पाटील, श्री प्रितेश शंकर राऊळ, श्रीमती शोभा गुलाबराव गावडे, श्री संदीप एकनाथ गावडे, श्री विक्रांत विकास सावंत, श्रीमती अर्पणा वसंत सातोस्कर, श्री प्रमोद मधुकर कामत, श्रीमती श्वेता सूर्यकांत धर्ने , व रामा दशरथ गवस या भाजप सदस्यांनी हा गट स्थापन केला आहे.

गटाच्या स्थापनेनंतर गटनेते म्हणून संजय बोबडे यांनी जिल्हाधिकारी सौ तृप्ती धोडमिसे यांची भेट घेत याबाबतचे पत्र दिले आहे. 16 मार्चला जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड होत असून संजय बोबडी हे सत्ताधारी असलेल्या गटाचे गटनेते म्हणून काम पाहणार आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *