कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपा महायुतीचे संतोष पारकर यांना पक्षाने दिली उमेदवारी

0 minutes, 2 seconds Read

नांदगाव पं. स. हर्षदा वाळके यांना पुन्हा संधी तर कासार्डे पं.स.अण्णा खाडये यांना उमेदवारी

 

कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघात “आपला हक्काचा माणूस” कार्यकर्त्यांच्या स्टेटस ला पोस्टर

 

कणकवली (प्रतिनिधी)

 

कणकवली तालुक्यातील कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघातओबीसी सर्वसाधारण आरक्षण असल्याने बरेच चेहरे इच्छुक असल्याचे चित्र दिसून येत होते. मात्र या इच्छुकांमधून अखेर आज कासार्डे येथील उद्योजक संतोष पारकर यांना ए. बी. फॉर्म देत पक्षाने उमेदवारी दिली आहे.

 

तर नांदगाव पंचायत समिती मधून मागील निवडणूक लढविलेले हर्षदा वाळके तर कासार्डे पंचायत समितीमध्ये सहदेव उर्फ अण्णा खाडये यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.यात नांदगाव पंचायत समिती च्या हर्षदा वाळके यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे. तर जिल्हा परिषद व कासार्डे पंचायत समिती ला नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.

 

नांदगाव पंचायत समिती मध्ये ओबीसी आरक्षण असल्याने तसेच सभापती पद ओबीसी महिला आहे. व ओबीसी महिला या नांदगाव पंचायत समिती व नाटळ मध्ये असल्याने या दोन्ही पंचायत समिती निवडणूक महत्त्वाच्या मानल्या जात आहे.

 

कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघात कासार्डे, ओझरम,दारुम असा तिनं गावांचा पंचायत समिती एक मतदार संघ तर दुसरा नांदगाव पंचायत समिती मतदार संघात नांदगाव, तोंडवली, बावशी,असलदे,कोळोशी, आयनल असा दुसरा पंचायत समिती मतदार संघ आहे. मागच्या वेळी कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघात त्यावेळी काँग्रेस कडून संजय देसाई तर भाजपा सेना युती कडून संजय पाताडे अशी लढत पाहायला मिळाली होती. या लढतीत संजय देसाई भरघोस मतांनी निवडून आले होते.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *