श्रीराम सेवा मंडळ हळवल (मुंबई) व स्थानिक श्रीराम सेवा मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव 

0 minutes, 2 seconds Read

 

कणकवली दि १८ ऑगस्ट (तुळशीदास कुडतरकर)

 

 

श्रीराम सेवा मंडळ हळवल (मुंबई) व स्थानिक श्रीराम सेवा मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव 

 

 

कणकवली तालुक्यातील हळवल येथील श्री राम मंदिर येथे गावातील दहावी बारावी व पदवी परीक्षा उत्तीर्ण इतर शैक्षणिक अहर्ता प्राप्त केलेल्या व उल्लेखनीय काम केलेले गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ श्रीराम सेवा मंडळ हळवल(मुंबई) व स्थानिक श्रीराम सेवा मंडळाच्या वतीने रविवारी १८ ऑगस्ट रोजी करण्यात आला .

यशस्वी मुलांना भेटवस्तू शैक्षणिक साहित्य व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले एकूण 40 मुलांचा गुण गौरव करण्यात आला यावेळी गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक व हळवल गावातील ग्रामस्थ उपस्थित होते .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर मार्गदर्शन व सूत्रसंचालन शामसुंदर राणेसर यांनी केले .मुंबईचे मंडळाचे उपाध्यक्ष श्री ज्ञानदेव राणे यांनी आपल्या मनोगतात मुंबई मंडळाचे कार्य व मंडळा विषयी माहिती सांगताना मुलांना मार्गदर्शन केले.

आभार ॲडवोकेट शंकर राणे यांनी मांडले यावेळी मंडळाचे संस्थापक सचिव चंद्रकांत राणे स्थानिक मंडळाचे उपाध्यक्ष तातूराणे हळवल, गावचे माजी सरपंच तथा मंडळाचे सदस्य लक्ष्मण मारुती राणे तसेच सामाजिक कार्यकर्ते व मंडळाचे सदस्य माजी सरपंच शशी राणे सामाजिक कार्यकर्ते भास्कर राणे व ज्येष्ठ सदस्य विठोबा राणे, हळवल गावचे तंटामुक्ती अध्यक्ष मारुती सावंत, स्थानिक मंडळाचे सदस्य दिनेश तावडे, पांडुरंग राणे, विक्रम राणे, प्रशांत राणे ,बापू पाटकर, विक्रम राणे, मंदार राणे मयूर राणे, हे उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंदार राणे, मयूर आणि विक्रम राणे दिनेश तावडे यांचे सहकार्य लाभले.

दहावी, बारावी, पदवी व इतर उच्च शैक्षणिक पात्रता धारक व इतर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या सन 2023-24 या वर्षातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्री.ज्ञानदेव शिवराम राणे यांनी पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले . सुत्रसंचालन व प्रास्ताविक पर मार्गदर्शन शामसुंदर राणे सर यांनी केले.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *