देवगड (प्रतिनिधी)
तिर्लोट आंबेरी येथील श्रीशा भाबल आत्महत्या प्रकरणी पती, व सासू सासरे यांना पंधरा दिवसाची न्यायालयीन कोठडी
तिर्लोट- आंबेरी येथील शिरीषा उर्फ श्रीशा सुरज भाबल (२४) हिला तिच्या लहान मुलांसमवेत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती सुरज सुहास भाबल (३७), सासरे सुहास शिवराम भाबल (७७), सासू सुहासिनी सुहास भाबल (६५, सर्व रा. तिर्लोट आंबेरी) या संशयितांना देवगड न्यायालयाने पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. संशयितांच्यावतीने ॲड. कौस्तुभ मराठे यांनी काम पाहिले.
