देवगड (प्रतिनिधी)
कृषी योजनाचा लाभ घेऊन शाश्वत उत्पन्न वाढवा दिगंबर खराडे
तालुका कृषी व पंचायत समिती देवगड कृषी विभागामार्फत असलेल्या योजनांचा लाभ घेऊन शाश्वत उत्पन्न वाढवा तसेच आंबा , काजु लागवड सोबत बांबु लागवड ही मोठया प्रमाणात करा असे आवाहन देवगड पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी दिगंबर खराडे यांनी केले.
१ जुलै माजी मुख्यमंत्री व हरीत क्रांतीचे प्रणेते कै .वसंतराव नाईक यांच्या जन्मदिना निमित्त कृषी दिन पंचायत समिती देवगड , तालुका कृषी कार्यालय व ग्रामपंचायत फणसगांव यांच्या संयुक्त विदयमाने जि.प. केंद्र शाळा पांडुरंग स्कूल फणसगांव शाळेत साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे उद्घाटन दिपप्रज्वलनाने व माजी मुख्यमंत्री व हरीत क्रांतीचे प्रणेते कै .वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन पंचायत समिती देवगड सहाय्यक गटविकास अधिकारी दिगंबर खराडे व फणसगांव सरपंच शितल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी विठ्ठलादेवी सरपंच ज्योती नारकर , फणसगांव उपसरपंच भुषण नरसाळे , उपनिरीक्षक विजयदुर्ग दशरथ चव्हाण , कृषी उद्यानवेता, रामेश्वर फळ संशोधन केंद्राचे डॉ . अजय मुंज ,विस्तार अधिकारी अभिजित मदने ,तालुका कृषी अधिकारी आरती पाटील , विस्तार अधिकारी ग्रा.प दिपक तेंडुलकर , विस्तार अधिकारी कृषी लक्ष्मीकांत जोशी, कृषी अधिकारी विलास कोलते , पोलीस पाटील अविनाश पाटील , ग्रामपंचायत अधिकारी विवेक नर, ग्रा.प.सदस्य कृष्णकांत आडीवरेकर, सुजाता पेंडुरकर , अनुराधा नरसाळे , गोवळ गावचे प्रगतशिल शेतकरी नासीर सोलकर, मंडळ कृषी अधिकारी डॉ . बि. एम . लांबाडे, शिरगांव सहा . कृषी अधिकारी मंगेश घनमोडे, सुनिल तेली , समन्वयक दिपीका रावराणे , कोमल शिंगणे आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी कृषी उद्दानवेता डॉ़ . अजय मुंज यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की शेतीचे उत्पादन तसेच आंबा बागायतदारांचे उत्पादन वाढवण्यासाठी किटकानाशके व खताचा सुक्ष्म नियोजन करून वापर करा असे आवाहन केले.तसेच तालुका कृषी अधिकारी आरती पाटील यांनी शेतकरी ओळखकार्ड काढण्याचे आवाहन केले .
या कार्यशाळेत कृषी विभागाच्या विविध योजना, भात लागवडीच्या विविध पद्धती, भातलागवड तंत्रज्ञान, फळबाग लागवड योजना, पीएम किसान योजना, पीक विमा योजना याविषयी सखोल मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी आरती पाटील , पंचायत समिती देवगड सहाय्यक गटविकास अधिकारी दिगंबर खराडे , कृषी उद्दानवेता डॉ़ . अजय मुंज यांनी मार्गदर्शन केले . तसेच ड्रॅगन फ्रुट बाबत मार्गदर्शन गोवळ गावचे प्रगतशिल शेतकरी नासीर सोलकर यांनी केले . त्यानंतर फणसगांव उपसरपंच भुषण नरसाळे यांनी शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला ग्रामस्थ , शेतकरी , सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते .दुपारच्या सत्रात शाळेच्या परीसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मीकांत जोशी , स्वागत अभिजित मदने तर आभार दिगंबर खराडे यांनी मानले .
Post Views: 116
