सावंतवाडी (प्रतिनिधी)
संप काळात ग्रामपंचायत मध्ये हजर न राहिल्याच्या पूर्व रागातून सातार्डा तर्फे साटेली ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर यांना संप संपल्यावर कामावर हजर करून न घेतल्याने गर्भवती डाटा ऑपरेटर महिला वैभवी साटेलकर यांनी महिला दिनी सावंतवाडी पंचायत समिती समोर उपोषण छेडण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.
माहिती अशी की ग्रामपंचायत मध्ये डाटा ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सामूहिक संप पुकारला होता संप कालावधीमध्ये डाटा ऑपरेटर म्हणून ग्रामपंचायत मध्ये कामावर न जाण्याचा निर्णय संघटनेमार्फत घेण्यात आल्याने संपामधील सहभागी डाटा ऑपरेटर ग्रामपंचायत मध्ये कामावर हजर राहिले नाहीत. सावंतवाडी तालुक्यातील सातारा तर्फ साटेली ग्रामपंचायत च्या डाटा ऑपरेटर वैभवी साटलकर या संप असल्याने कामावर हजर राहिल्या नव्हत्या मात्र संपल्यानंतर त्या कामावर हजर होण्यासाठी गेले असता तेथील लिपिकाने वरिष्ठांनी डाटा ऑपरेटर यांना हजर करून घेऊ नये व काम करण्यास देऊ नये असे मला सांगितल्या मी आपणाला हजर करून घेऊ शकत नाही असे लिपिकाने सांगितले.
यानंतर सदरची डाटा ऑपरेटर महिला सलग दोन दिवस ग्रामपंचायत मध्ये हजर होण्यासाठी केली असता ग्रामपंचायत बंद असल्याने तिला हजर होता आले नाही.दरम्यान कामावर 24 तासाच्या आत हजर व्हा अन्यथा आपले सेवा समिती करण्यात येईल असे पत्र ग्रामपंचायतने रजिस्टर पोस्टाने पाठवल यावेळी सदस्य पत्र ग्रामपंचायत कार्यालयासमोरच पोस्टमध्ये दिल्याने पत्र घेऊन ती महिला त्याच ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय उघडण्याची वाट बघत सायंकाळी उशिरापर्यंत बसले असता कोणत्याही कर्मचारी, लोक प्रतिनिधी किंवा अधिकारी ग्रामपंचायतकडे फिरकला नाही.
तीन दिवसानंतर महिला डाटा ऑपरेटर ग्रामपंचायत मध्ये मला तुम्ही का हजर करून घेत नाही असं विचारणा करण्याकरिता गेली असता आपण कामावर का हजर राहिलात नाही याचा लेखी खुलासा द्या नंतरच आम्ही पुढील निर्णय घेऊ असे सरपंच यांनी डाटा ऑपरेटरला लेखी पत्र देत कळविले. यावर सदर ऑप्टरने आपण संप असल्याने ग्रामपंचायत मध्ये कामावर हजर राहू शकले नाही मात्र संप संपल्यानंतर आपण ग्रामपंचायत मध्ये हजर राहण्यासाठी गेली असता सलग तीन दिवस ग्रामपंचायत बंद असल्याने मला हजर राहता आले नाही असा लेखी खुलासा दिला मात्र असा लेखी खुलासा देऊ नये सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी सदर डाटा ऑपरेटरला हजर करून घेतले नाही.त्यामुळे तिला हजर होता आलेली नाही. यानंतर सदर लेटर ऑपरेटर महिलेने वरिष्ठ कार्यालयास कडे निवेदनाद्वारे सदरचा प्रकार मांडला.
यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, सावंतवाडी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी सदर डाटा ऑपरेटरला तात्काळ हजर करून घ्या व तसा अहवाल कार्यालयाला पाठवा अशा लेखी आदेश सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांना दिले. याही आदेशानंतर सदर डाटा ऑपरेटरला हजर करून न घेतल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशालाही लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी केराची टोपली दाखवली.
अखेर वरिष्ठांच्या आदेशानंतरही ग्रामपंचायत डाटा इंट्री ऑपरेटर म्हणून हजर करुन घेत नसल्याबद्दल वैभवी प्रशांत साटेलकर यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.जागतिक महिला दिनापासून त्या पंचायत समिती सावंतवाडी समोर उपोषणाला बसणार आहे. एका गर्भवती महिलेला कोणतीही चूक नसताना अशी अपवानास्पद वागणूक देऊन कामावर हजर राहण्यापासून रोखून तिच्यावर अन्याय करणाऱ्यांवर प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
याबाबत डाटा ऑपरेटर साटेलकर यांच्याशी संपर्क साधला असता आपण गर्भवती असून उपोषणामुळे मला व माझ्या बाळाला कोणत्याही प्रकारे त्रास झाल्यास, जीवीतास धोका निर्माण झाल्यास त्यास सरपंच, उपसरपंच व तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी कुबल व विद्यमान ग्रामपंचायत अधिकारी सावंत हेच जबाबदार राहतील असं मत त्यांनी व्यक्त केल आहे.
त्यामुळे एकिकडे जिल्ह्यात महिला दिनाचा सोहळा करणारे प्रशासन गर्भवती महिलेला उपोषणापूर्वी न्याय देणार का ? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.
