मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या गुणवंतांचा संस्थेच्यावतीने सत्कार

0 minutes, 2 seconds Read

 

सावंतवाडी (प्रतिनिधी)

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या गुणवंतांचा संस्थेच्यावतीने सत्कार

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स् इंग्लिश स्कूलने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उत्तुंग यश संपादित करून 100% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत पुनः एकदा शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

 

 

कु मानसी मिलेश मालजी हिने 96.60% प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला तर कु.आयुष जितेष वेंगुर्लेकर याने 95.40% मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर कु. पियुषा उमाजी राणे हिने 94% संपादित करून तृतीय क्रमांक पटकावला.तसेच कु. यश विष्णू देसाई 93.60% , कु.पुर्वा प्रवीण देसाई 91.60%, कु.त्रिशा कांडरकर 90.80, कु भुषण मडगावकर 90.80, कु.रमेश कोठावळे 89.40%यांनी देखील नेत्रदीपक यश संपादित केले.या सर्व यशवंत विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार दिनांक 16-05-2025 रोजी संस्थेच्यावतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त युवराज लखमराजे भोंसले, सहाय्यक संचालक अॅडव्होकेट शामराव सावंत, सदस्य श्री जयप्रकाश सावंत व डॉ. सतिश सावंत तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावकर व शिक्षकवर्ग उपस्थित होता.सर्व मान्यवरांनी उपस्थित गुणवंतांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *